Shraddha Kapoor Wrote A Poem On Love Actress Shared A Post
‘स्त्री २’ चे दिग्दर्शक अमर कौशिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटातील कास्टिंगबद्दल अमर कौशिक बोलताना दिसत आहे. संभाषणादरम्यान तो असे म्हणताना ऐकू येतो की दिनेश विजनने त्याला सांगितले की श्रद्धा चेटकिणीसारखी हसते. आता हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते चांगलेच संतापले आहेत. तसेच ते या व्हिडीओवर कंमेंट करून टिक्का करत आहेत.
काय रिअॅलिटी शोमध्येही होते राजकारण? ‘इनसाइडर विथ फैसू’ मध्ये फराह खानने केला खुलासा!
व्हिडिओमध्ये अमर कौशिक काय म्हणाला?
व्हायरल व्हिडिओमध्ये अमर कौशिक कोमल नाहटाशी बोलताना दिसत आहे. यावेळी, श्रद्धाच्या कास्टिंगबद्दल ते म्हणाले, ‘श्रद्धेच्या कास्टिंगचे श्रेय पूर्णपणे दिनेश विजानला जाते. तो श्रद्धासोबत फ्लाइटने आला होता आणि तो तिला फ्लाइटमध्ये भेटला. तो मला म्हणाला, अमर ती स्त्री सारखी हसते. ती चेटकिणीसारखी हसते, माफ कर श्रद्धा. कदाचित त्याने असं काहीतरी म्हटलं असेल, मला आठवत नाही की तो डायन म्हणाला होता की असं काही? म्हणून, जेव्हा मी श्रद्धाला भेटलो तेव्हा मी तिला आधी हसण्यास सांगितले.’ असं तो या मुलाखतीत बोलताना दिसला आहे.
First Apar, now him?! Is this some new trend where men from her own films diss her publicly? This is how you talk about your leading lady?? First they promoted the film on her name and after that talking sh!t!
Shraddha deserves better team members!!pic.twitter.com/l1a1GXDjSZ— 💭 (@shraddhafan_grl) April 5, 2025
श्रद्धा कपूरचे चाहते संतापले
हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच श्रद्धाच्या चाहत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. अमर कौशिकच्या या बोलण्याबद्दल ते रागावलेला दिसत आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर आता कंमेंट करून टीका करण्यास सुरवात केली आहे.
Good Bad Ugly चित्रपटाच्या ट्रेलरने उडवली खळबळ, बनवला ‘हा’ मोठे रेकॉर्ड!
चाहत्यांनी केली टीका
निर्मात्यावर टीका करताना एका चाहत्याने लिहिले, “आधी अपार, आता ती! हा एक नवीन ट्रेंड आहे का जिथे त्यांच्याच चित्रपटातील पुरुष सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान करत आहेत? तुम्ही तुमच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल असे बोलता? आधी त्याने तिच्या नावाने चित्रपटाचे प्रमोशन केले, नंतर तिला बकवास बोलत आहे! श्रद्धाला चांगल्या टीम सदस्यांची आवश्यकता आहे!”, असं लिहून अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. दरम्यान, श्रद्धाचे चाहते ‘स्त्री’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. मॅडॉक फिल्म्सने घोषणा केली आहे की ‘स्त्री ३’ १३ ऑगस्ट २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.