(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही कॉमेडी-कुकिंग शो “लाफ्टर शेफ्स” पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिवाळीनिमित्त कलर्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. “लाफ्टर शेफ्स सीझन ३” च्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोमध्ये एक्स स्पर्धकांचे पुनरागमन होणार आहे. ज्यामध्ये कृष्णाअभिषेक, जन्नत आणि यांच्यासह अनेक कलाकार सामील होणार आहेत.
कलर्स टीव्हीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की “लाफ्टर शेफ्स” एका नवीन सीझनसह टेलिव्हिजन स्क्रीनवर परतणार आहे. या अधिकृत घोषणेमुळे चाहत्यांसाठी दिवाळी आणखी खास झाली आहे. हा सीझन मागील दोनपेक्षा खूपच भव्य आणि अधिक मनोरंजक असणार आहे. तसेच पुन्हा सगळ्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. “लाफ्टर शेफ्स सीझन ३” मध्ये काय धमाका होणार आणि नवीन काय घडणार हे आपण आता जाणून घेणार आहोत.
“लाफ्टर शेफ्स सीझन ३” मध्ये काय खास असेल?
द इंडियन एक्सप्रेसने चॅनेलचा हवाला देत वृत्त दिले आहे की या शोमध्ये मूळ स्पर्धक, कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह, अली गोनी आणि जन्नत झुबैर यांच्यासह पुनरागमन पाहायला मिळणार आहे. सीझन १ आणि २ मधील काही एक्स स्पर्धक देखील शोचा भाग असणार आहेत. तीन ते चार नवीन कलाकार देखील तिसऱ्या सीझनला अधिक आकर्षक आणि मनोरंजक बनवतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खुप आनंदी आहेत.
‘लाफ्टर शेफ्स’ सीझन ३ कधी येणार?
रिपोर्ट्सनुसार, ‘लाफ्टर शेफ्स’ सीझन ३ हा कलर्सच्या लोकप्रिय रि ॲलिटी शो ‘पती पत्नी और पंगा’ची जागा घेणार आहे. ‘पती पत्नी और पंगा’ मधील काही कलाकार या शोमध्ये सामील होतील असे वृत्त आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ‘लाफ्टर शेफ्स’ हा फिलर म्हणून प्रदर्शित झाला होता, त्यामुळे सीझन १ मध्ये कोणीही विजेता नव्हता, परंतु एल्विश यादव आणि करण कुंद्रा यांनी सीझन २ चा ट्रॉफी जिंकली. ‘लाफ्टर शेफ्स’ च्या सलग दोन सीझनच्या यशानंतर, भारती सिंगच्या कॉमेडी कुकिंग शोचा तिसरा सीझन २०२५ च्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.