Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलीजपूर्वीच Mardaani 3 वर सेन्सॉरची कात्री! राणी मुखर्जीच्या चित्रपटात झाले मोठे बदल; जाणून घ्या कारण

राणी मुखर्जीचा चित्रपट ३० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. तथापि, तो आता सेन्सॉर बोर्डाकडे अडकला आहे. सीबीएफसीने चित्रपटात अनेक बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 24, 2026 | 04:10 PM
रिलीजपूर्वीच Mardaani 3 वर सेन्सॉरची कात्री! राणी मुखर्जीच्या चित्रपटात झाले मोठे बदल (Photo Credit- X)

रिलीजपूर्वीच Mardaani 3 वर सेन्सॉरची कात्री! राणी मुखर्जीच्या चित्रपटात झाले मोठे बदल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रिलीजपूर्वीच Mardaani 3 वर सेन्सॉरची कात्री!
  • राणी मुखर्जीच्या चित्रपटात झाले मोठे बदल
  • जाणून घ्या कारण
 Mardaani 3 News: बॉलिवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘शिवानी शिवाजी रॉय’ ही लोकप्रिय भूमिका पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच, सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या चित्रपटाला मोठा दणका दिला आहे. चित्रपटाला ‘UA 16+’ प्रमाणपत्र देताना बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात तब्बल १० महत्त्वाचे बदल करण्यास भाग पाडले आहे.

३० जानेवारीला होणार प्रदर्शित

हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या अटी पूर्ण केल्यावरच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. या बदलांमुळे चित्रपटाच्या कथानकावर किंवा संवादांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#Xclusiv… ‘MARDAANI 3’ RUN TIME… #Mardaani3 certified ‘UA 16+’ by #CBFC on 14 January 2026. Duration: 130.37 min:sec [2 hours, 10 min, 37 sec]. #India ⭐ Theatrical release date: 30 January 2026. pic.twitter.com/OU8HXJQmfJ — taran adarsh (@taran_adarsh) January 23, 2026

संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र! भारतीय कथाकथनाचा प्रवास मांडणारा एक भव्य आणि भावपूर्ण प्रयोग ‘भारत गाथा’

सेन्सॉर बोर्डाने केलेले ‘हे’ प्रमुख १० बदल

१. ड्रग डिस्क्लेमर: अमली पदार्थांच्या संदर्भातील वैधानिक इशारा (Disclaimer) चित्रपटात जोडण्यात आला आहे.

२. संवादात बदल: एका महत्त्वाच्या संवादातून ‘बच्ची’ हा शब्द हटवून त्याऐवजी ‘लड़की’ असा बदल करण्यात आला आहे.

३. वय पडताळणी: संबंधित दृश्यात काम करणाऱ्या बालकलाकाराच्या वयाचे अधिकृत पुरावे बोर्डात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

४. हिंसाचाराच्या दृश्यांवर कात्री: एका दृश्यात मुलीला थोबाडीत मारताना दाखवण्यात आले होते, त्या दृश्यात फेरबदल (Modify) करण्यात आले आहेत.

५. अपशब्द म्यूट: आईबद्दल वापरण्यात आलेले अपशब्द सेन्सॉर बोर्डाने म्यूट केले आहेत.

६. इंग्रजी सबटायटल्समध्ये बदल: इंग्रजी सबटायटल्समधील ‘Whore’ या शब्दाऐवजी आता ‘Traitor’ हा शब्द वापरला जाणार आहे.

७. अश्लील शब्द हटवले: लैंगिक अवयवांशी संबंधित आक्षेपार्ह शब्दांना कात्री लावण्यात आली आहे.

८. देशांची नावे वगळली: एका दृश्यात अनेक देशांची नावे घेण्यात आली होती, ती नावे काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

९. भारत सरकारचा संदर्भ: भारत सरकारबद्दल वापरलेले नकारात्मक संदर्भ असलेले शब्द बदलण्यात आले आहेत.

१०. महत्त्वाची माहिती (Information Strips): महिला आणि बाल तस्करीशी संबंधित कायदेशीर माहिती असलेल्या पट्ट्या (Text Strips) चित्रपटात जोडण्यास सांगण्यात आले आहे.

शिवानी शिवाजी रॉयचा नवा संघर्ष

‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’ च्या तुफान यशानंतर तिसऱ्या भागात राणी मुखर्जी कोणत्या सामाजिक विषयावर प्रहार करणार, याची उत्सुकता होती. तस्करी आणि गुन्हेगारी विश्वाचे दाहक वास्तव मांडणाऱ्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कडक नजर ठेवली आहे.

श्रद्धा, तर्क आणि परंपरेचा संगम; ‘देवखेळ’ मध्ये प्राजक्ता साकारणार अनोखी भूमिका, सांगितला अनुभव

Web Title: Mardaani 3 faces censorship cuts even before its release major changes have been made to rani mukerjis film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Bollywood
  • Rani Mukerji

संबंधित बातम्या

Salman Khan Movie : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने देशभक्तीचा सूर घुमणार; ‘Battle of Galwan’मधील पहिलं गाणं रिलीज
1

Salman Khan Movie : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने देशभक्तीचा सूर घुमणार; ‘Battle of Galwan’मधील पहिलं गाणं रिलीज

KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?
2

KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?

Matrubhumi : मनाला भिडेल असे आहे Battle Of Galwan चे नवीन गाणे, सलमान खानने जाहीर केली रिलीज डेट
3

Matrubhumi : मनाला भिडेल असे आहे Battle Of Galwan चे नवीन गाणे, सलमान खानने जाहीर केली रिलीज डेट

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा; अभिनेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वडील बांधणार चित्रपट संस्था आणि अभिनय वर्ग
4

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा; अभिनेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वडील बांधणार चित्रपट संस्था आणि अभिनय वर्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.