Rajinikanth With Mithun: प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborthy) सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ मुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले आहे की, ते लवकरच ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांच्यासोबत दिसणार आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की, रजनीकांत आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात ते दोघे भेटले आणि त्याचवेळी रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. मिथुन यांनी लगेचच होकार दिला. मिथुन चक्रवर्ती २५ ऑगस्टपासून ‘जेलर २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
Interestingly, Rajinikanth had earlier made special appearances in Mithun’s films—#Bhrashtachar (1989) in Hindi and #BhagyaDevta‘(1997) in Bengali.
.#OCDTimes #Rajinikanth #MithunChakraborty #Jailer #Jailer2 #AnirudhRavichander #SunPictures pic.twitter.com/3tUEDzD4Va— OCD Times (@ocdtimes) August 20, 2025
याआधी १९९५ मध्ये ‘भाग्य देवता’ या बंगाली चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. हा रजनीकांत यांचा एकमेव बंगाली चित्रपट आहे, ज्यात ते एका विशेष भूमिकेत (Special Appearance) दिसले होते. त्यापूर्वी १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपट ‘भ्रष्टाचार’ मध्येही ही जोडी एकत्र दिसली होती.
रजनीकांत यांच्यासोबतच मिथुन चक्रवर्ती लवकरच प्रभास यांच्या आगामी चित्रपट ‘फौजी’ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबद्दल बोलताना मिथुन यांनी सांगितले की, ते सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत, पण त्याबद्दलची माहिती ते सध्या देऊ शकत नाहीत. मिथुन चक्रवर्ती त्यांच्या आगामी चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ मध्ये एका दंगल-ग्रस्त आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, जो चित्रपटाच्या कथानकात अंतरात्म्याचा आवाज बनून समोर येतो.