फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंज्या सिनेमा ओटीटीवर : बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येत आहेत, यामधील काही चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत तर काही चित्रपट सिनेमा गृहांमध्ये कमाई करण्यामध्ये फेल होत आहेत. ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या मुंज्याने १३२ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा ६वा चित्रपट ठरला. या चित्रपटातील तरस नहीं आया हे गाणेही खूप चर्चेत होते. शर्वरी वाघच्या डान्सिंग मूव्ह्ज खूप आवडल्या. त्याचबरोबर शर्वरी वाघची चित्रपटामधील अभिनय सुद्धा प्रेक्षकांना आवडला आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट मुंज्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता तुम्ही घरी बसून मुंज्या पाहू शकता.
मुंज्या हा सिनेमा प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. मुंज्या हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रवाहित होत आहे. पोस्ट करताना डिस्ने प्लस हॉटस्टारने लिहिले – “तुला मुंज्याची आठवण आली आणि तो मुन्नीला शोधण्यासाठी धावत आला. सर्व मुन्नीवर सावध रहा.” या सिनेमाची स्ट्रीमिंग सुरु झाली आहे. त्यासाठी तुमच्याकडे डिस्ने प्लस हॉटस्टार सब्स्क्रिबशन असणे गरजेचे आहे.
मुंज्यामध्ये शर्वरी वाघ, अभय वर्मा, सत्यराज आणि मोना सिंह सारखे स्टार्स आहेत. अमर कौशिक आणि दिनेश विजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कथेवर आणि स्टार्सच्या अभिनयावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते आणि तोंडी शब्द देखील खूप चांगले होते.