Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yo Yo Honey Singh Famous: रॅपर हनी सिंगवर बनली डॉक्युमेंटरी फिल्म, सिनेमात नाही तर ओटीटीवर होणार प्रदर्शित!

नेटफ्लिक्सने 'यो यो हनी सिंग फेमस' या रॅपर यो यो हनी सिंगवरील माहितीपटाची घोषणा केली आहे. यासोबतच पोस्टर रिलीज करून त्याची स्ट्रीमिंग डेटही जाहीर करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 06, 2024 | 03:49 PM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘द रोशन्स’नंतर नेटफ्लिक्सने संगीत उद्योगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या रॅपर यो यो हनी सिंगवर नवीन माहितीपटाची घोषणा केली आहे. मोजे सिंगच्या दिग्दर्शनाखाली ऑस्कर विजेते सिख्या एंटरटेनमेंटने बनवलेल्या या माहितीपटाचे नाव ‘यो यो हनी सिंग फेमस’ असे ठेवण्यात आले आहे. हे गायक आणि रॅपरच्या जीवनावर प्रकाश टाकेल आणि त्याची प्रसिद्धी आणि त्याला तोंड देत असलेली आव्हाने या सगळ्याचा खुलासा होणार आहे.

Netflix ने पोस्टर शेअर केले आहे
ओटीटी प्लॅटफॉर्मने इंस्टाग्रामवर रॅपरचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये तो मायक्रोफोनसमोर आत्मविश्वासाने उभा आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुम्हाला माहीत असलेले नाव, तुम्हाला माहीत नसलेली कथा. एका महापुरुषाच्या उदयाचे साक्षीदार व्हा ज्याने भारतीय संगीताचा चेहरा कायमचा बदलून टाकला. 20 डिसेंबर रोजी ‘यो यो हनी सिंग फेमस’ फक्त Netflix वर पहा.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

 

वापरकर्त्यांनी दिला प्रतिसाद
या घोषणेने हनी सिंगच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘शेवटी येत आहे.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली, ‘हे खूप मोठे होणार आहे.’ दुसऱ्या कमेंटमध्ये ‘मी पहिल्यांदाच फक्त हनी पाजीसाठी नेटफ्लिक्सचे सदस्यत्व घेईन.’ असे लिहून चाहत्यांनी हा चित्रपट रिलीज होण्याआधीच भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हनी सिंगच्या न ऐकलेल्या गोष्टी समोर येणार आहेत
हा चित्रपट हनी सिंगचा संघर्ष, उदय, पतन, नैराश्य आणि इंडस्ट्रीमध्ये परत येण्याच्या काही मनोरंजक झलक दाखवेल. जिथे त्याच्या आयुष्यातील प्रेम, वेदना, कुटुंब, यश, अपयश, मानसिक आरोग्यापासून ते प्रसिद्धीच्या खर्चापर्यंत सर्व काही समोर येईल. या माहितीपटात काही रंजक खुलासे होण्याची शक्यता असून चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता चाहते हनी सिंगच्या डॉक्युमेंट्री फिल्मच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Aamir Khan: ‘सीतारे जमीन पर’ पुढच्या वर्षी होणार रिलीज, अभिनेता सनी देओल आणि मुलगा जुनैदच्या सिनेमातही करणार काम!

माहितीपट सादर करताना अभिमान वाटतो
निर्माता गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी सांगितले की, ‘द एलिफंट व्हिस्पर्सच्या यशानंतर, या खऱ्या देसी कलाकाराची लवचिकता, पुनर्शोध आणि अनफिल्टर सत्य कॅप्चर करणारा एक डॉक्युमेंटरी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो – हा प्रवास चाहत्यांना आणि समीक्षकांना आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. ते तितकेच आकर्षक वाटते. ही विलक्षण कथा जगभरातील प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी दिग्दर्शक मोजे सिंग आणि नेटफ्लिक्ससोबत पुन्हा सहयोग करण्यास आम्ही रोमांचित आहोत.’ असे ते म्हणाले.

Web Title: Netflix announce yo yo honey singh famous documentary film release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 03:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.