(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आमिर खानने त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटाबाबत चर्चा रंगली आहे. हा चित्रपट यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता. आता त्याची रिलीज डेट 2025 च्या मध्यावर करण्यात आली आहे. ‘सीतारे जमीन पर’ व्यतिरिक्त आमिरने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दलही सांगितले आहे. तसेच अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसूजाही असणार आहे. याशिवाय त्याचा ‘हॅपी पटेल’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये वीर दास, इम्रान खान आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘सीतारे जमीन पर’ बाबत आमिर खानने केली चर्चा
डेडलाइनशी बोलताना आमिर खानने सांगितले की, तो स्वत: त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल पुढील वर्षाच्या मध्यात चित्रपटगृहात येऊ शकतो, असे आमिर खानने सांगितले आहे. हा चित्रपट 2007 साली आला होता. या चित्रपटाबद्दल आमिर खान म्हणाला की, हा चित्रपट नवीन कथा, नवीन पात्र आणि पूर्णपणे नवीन परिस्थितीवर आधारित आहे. हे ऐकून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
आमिर खान सनी देओलसोबत चित्रपट बनवत आहे
आमिर खानने सांगितले की, आमिर खान त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘लाहोर 1947’ हा चित्रपट बनवणार आहे. यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या संवादात आमिर खानने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगितले आहे. अभिनेता म्हणाला की तो त्याच्या तिसऱ्या प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करणार आहे, तरीही या चित्रपटाबाबत आणखी काही बोलू शकला नाही. ‘लाहोर 1947’ हा अभिनेत्याचा २०२५ यामध्ये येणार दुसरा चित्रपट असणार आहे.
अभिनेता मुलगा जुनैदसाठीही चित्रपट बनवणार आहे
आमिर खानने सांगितले की, तो मुलगा जुनैद खानसाठीही एक चित्रपट तयार करत आहे. या चित्रपटात सई पल्लवीही दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘एक दिन’. आमिर खानने सांगितले की, तो दिग्दर्शक वीर दास यांच्यासोबत एका चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. वीर देखील स्वतः या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार हे अद्यापही अभिनेत्याने सांगितले नाही आहे.