‘गदर 2’ या चित्रपटानंतर सनी देओलने बॉक्स ऑफिसवर फडकवलेला झेंडा अजूनही लोक विसरू शकलेले नाहीत. हा चित्रपट तिकीट खिडकीवर ब्लॉकबस्टर ठरला होता. 2001 मध्ये आलेल्या या सिनेमाच्या सिक्वेलनंतर सनी देओल आता ‘बॉर्डर’ सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करताना दिसणार आहे. नुकतेच सनीने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे कथानक समोर आले आहे. निधी दत्ता या चित्रपटाची कथा लिहिणार असून, ही कथा कशावर आधारित असणार आहे हे त्यांनी उघड केले आहे.
‘बॉर्डर 2’ या चित्रपटाचे कथानक झाले उघड
बॉर्डर हा चित्रपट जेपी दत्ता यांनी बनवला होता. परंतु आता ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शकी अनुराग सिंग असणार आहेत. तर, जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ता या चित्रपटाची लेखिका असणार आहे. ‘बॉर्डर 2’ चित्रपटाची कथा निधी दत्ताच्या लेखणीतून येणार आहे, अशा परिस्थितीत हा सिक्वेल चित्रपट कोणत्या व्यक्तीवर आधारित असू शकतो याचा खुलासा तिने केला आहे. चित्रपटाचे कथानक तिने सांगितले आहे.
सत्य घटनेवर आधारित ‘बॉर्डर 2’ची कथा
बॉलीवूड लाईफशी बोलताना निधीने बॉर्डर 2 बद्दल सांगितले आहे, पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भागही सैनिकाच्या वास्तविक जीवनावर आधारित असेल, असे तिने या मुलाखतीत सांगितले, हा चित्रपट केवळ वास्तविक जीवनातील पात्रांवर आधारित असेल, असे देखील त्यांनी उघड केले आहे. निधी म्हणाली, “आमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तो एक धैर्यवान व्यक्ती होता. मी अजूनही त्याचे मॉडेल पाहते. त्यांनी ज्या प्रकारे देशासाठी उभे राहून आमचे रक्षण केले ते विसरता येणार नाही.” असे ती म्हणाली.
‘बॉर्डर 2’ ही देशाच्या सैनिकांची कथा
निधीने असेही सांगितले की, ‘दिवंगत बिपिन रावत तिचे वडील जेपी दत्ता यांच्यासोबत बसले होते. त्यांनी काही याद्या दिल्या. संशोधन झाल्यावर यावर चित्रपट बनवता येईल असे त्यांना वाटले. त्या कथांमुळे मला जाणवलं की बॉर्डरचा दुसरा भाग या वर आधारित होऊ शकतो. अशा प्रकारे बॉर्डर 2 चित्रपटाच्या कथानकाची कल्पना सुचली. बॉर्डर २ हा चित्रपट देशाच्या सैनिकांची कथा आहे.’ असे ती म्हणाली. बॉर्डर 2 च्या माध्यमातून हा चित्रपट सैनिकांनासाठी अभिमान वाटेल असा असेल अशी तिने आशा तिने व्यक्त केली.
हे देखील वाचा- सनी देओलसह ‘बॉर्डर २’चा भाग बनणार दिलजीत दोसांझ? आयुष्मानबाबत झाला खुलासा!
या चित्रपटात अहान शेट्टी, एमी विर्क आणि आयुष्मान खुराना यांच्या उपस्थितीची बरीच चर्चा आहे. मात्र, अधिकृतपणे फक्त सनी देओलचे नाव फायनल झाले आहे.