
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नीता अंबानी आता ६२ वर्षांच्या झाल्या आहेत. १ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. त्यांच्या टीमने हा खास प्रसंग आणखी खास बनवला. त्यांच्यासाठी जामनगरमध्ये टीमने एक सरप्राईज सेलिब्रेशन आयोजित केले. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नीता अंबानी आणि त्यांची संपूर्ण टीम आनंदी दिसत आहे. तसेच या व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
अंबानी कुटुंबाच्या फॅन पेजवर नीता यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नीता अंबानींने जामनगरमध्ये टीमसोबत तिचा वाढदिवस साजरा केला.” असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नीता अंबानीचा वाढदिवस साजरा
नीताने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रॉयल पिंक सूट घातला होता. सूटमध्ये सोनेरी नक्षीकाम केलेले होते. तसेच नीता यांनी कानातले आणि वेणीने तिचा लूक पूर्ण केला होता. त्यांनी केसांमध्ये फुलेही घातली. कपाळावर छोटी टिकली आणि दागिन्यांनी त्यांचा लूक परिपूर्ण झाला होता. तसेच त्या व्हिडिओमध्येही खूप आनंदी दिसत होत्या.
व्हिडिओमध्ये नीता अंबानी या खोलीतून बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर त्यांच्या टीमने खोलीबाहेर त्यांच्यासाठी गुलाबांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्यावर नीता अंबानी चप्पल कडून चालताना दिसल्या. नीता खूप आनंदी आणि आश्चर्यचकित दिसत आहे. त्यानंतर टीमने वाढदिवसाची एक सुंदर सजावट केली, जिथे नीता अंबानी टीमसोबत केक कापताना देखील दिसले आणि तो सर्वांसोबत शेअर देखील केला.
नीता अंबानी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नीता अंबानी रिलायन्स फाउंडेशन आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक देखील आहेत. त्यांचे लग्न उद्योगपती मुकेश अंबानीशी झाले आहे. त्यांना तीन मुले आहेत. एक मुलगी, ईशा अंबानी आणि दोन मुले, आकाश आणि अनंत अंबानी आहेत. नीता यांची तिन्ही मुले विवाहित आहेत.
नीता अंबानी त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखली जाते आणि फॅशन आयकॉन आहे. त्यांचा प्रत्येक लूक अनेकदा व्हायरल होत असताना दिसत असतो. नीता अंबानी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला त्यांची सून राधिका मर्चंटसोबत उपस्थित होत्या. जिथे या दोघींचाही लूक पाहण्यासारखा होता. तसेच आता ते त्यांच्या वाढदिवसाच्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत.