(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आज २ नोव्हेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानच्या वाढदिवसामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा दिवस नेहमीच खास असतो. शाहरुख खान आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. मात्र, या यशामागे त्याचा प्रचंड संघर्ष दडलेला आहे. शाहरुखने ‘दीवाना’ (1992) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
आता त्याचे जुने मित्र आणि सुरुवातीचे मार्गदर्शक निर्माता विवेक वासवानी यांनी शाहरुखच्या चित्रपटातीलप्रवासातील एक किस्सा सांगितला आहे. विवेक यांच्या मते, शाहरुखने सर्वात आधी साइन केलेला चित्रपट ‘दीवाना’ नव्हता, तर दुसरा चित्रपट होता आणि त्या वेळी त्याला यासाठी फक्त काहीशे रुपयांचीच फी मिळाली होती.
‘मरण्याची घाई नाही…’, इंडस्ट्रीपासून ब्रेक घेण्याबद्दल काय म्हणाले सतीश शाह? मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला केला मेसेज
त्या काळात शाहरुख इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता आणि विवेक यांच्या घरी राहत होता.एका दिवशी हेमा मालिनी यांचा फोन आला त्या स्वतः दिग्दर्शित करत असलेल्या ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी अभिनेता शोधत होत्या. शाहरुख आणि विवेक दोघंही उत्साहात पण थोडे घाबरत त्यांच्या घरी गेले.तिथे त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती न्यूजपेपरच्या मागे लपून बसलेला आहे. त्यांनी पेपर खाली केला आणि शाहरुख थक्क झाले ते म्हणजे स्वतः धर्मेंद्र!थोड्याच वेळात हेमा मालिनी आल्या आणि त्यांनी शाहरुखचा लुक पाहून त्याला लीड अॅक्टरची ऑफर दिली. या वेळी विवेक वासवानी म्हणाले, “राकेश रोशन आणि रमेश सिप्पी आधीच शाहरुखला साइन करून बसले आहेत.”
६० वर्षांचा झाला King Khan; मन्नतबाहेर दिसली चाहत्यांची गर्दी, “भारताचा अभिमान, शाहरुख खान…” असे दिले नारे
हेमा मालिनींनी शाहरुखची एनर्जी आणि अभिनय पाहताच त्याला ‘दिल आशना है’ या चित्रपटासाठी साइन केलं आणि त्यासाठी ५०,००० रुपयांची ऑफर दिली. जी त्या काळातील एका नवीन कलाकारासाठी मोठं पाऊल होतं.
या चित्रपटात जीतेंद्र, मिथुन चक्रवर्ती, डिंपल कपाडिया, अमृता सिंह आणि कबीर बेदी यांसारखे दिग्गज कलाकारांनी काम केले होते. जरी दिल आशना है हा शाहरुखचा पहिला साइन केलेला चित्रपट असला तरी, त्यांचा पहिला चित्रपट राकेश रोशन दिग्दर्शित किंग अंकल आणि त्यांचा पहिला रिलीज झालेला दीवाना होता, जो त्यांचा यशस्वी चित्रपट ठरला.






