(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नुसरत भरुच्चा मुख्य भूमिकेत असलेला ‘छोरी’ हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होऊन आज या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित, साक्षीच्या भूमिकेतील नुसरतच्या दमदार अभिनयासाठी या हॉरर चित्रपटाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चाहते आणि प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. आता चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त नुसरत भरुचाने ‘छोरी 2’ ची रोमांचक झलक दाखवून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
पहिल्याच चित्रपटात तिच्या दमदार अभिनयाची वाहवा मिळवणाऱ्या नुसरतने सिक्वेलमधील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. फोटो पोस्ट करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “छोरी 2″ च्या एका झलकसह, छोरीची 3 वर्षे साजरी करत आहे. छोरी 2 लवकरच येत आहे.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाची झलक पाहून चाहते कंगकीत झाले आहेत. आणि या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
‘छोरी’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हिस, शिखा शर्मा आणि शिव चनाना यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक हिंदी भाषेतील भयपट चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लपाछपी या मराठी भाषेतील चित्रपटाचारिमेक आहे. ‘छोरी’ चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्यासोबत नुश्रत भरुच्चा मुख्य भूमिकेत आहेत.
सिक्वेलच्या या झलकांनी चाहत्यांना आणि प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे आणि आता या नव्या कथेत काय खास असेल हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुसरत भरुचाच्या आणखी एका दमदार अभिनयाची वाट पाहत, ‘छोरी 2’ मध्ये इतर कलाकारांसोबत तिचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.