(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टार्सच्या यादीत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक विवेक ओबेरॉय. 2002 मध्ये बॉलिवूड मध्ये एन्ट्री केलेल्या विवेकने कधीकाळी शूटआउट ॲट लोखंडवाला, रक्तचरित्र, ओमकारा, नक्षा, ज़िला गाजियाबाद, मस्ती यासारखे गाजलेले आणि चर्चेत राहिलेले सिनेमे केले. फक्त बॉलिवूडच नव्हे तर, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सुद्धा विवेकने काम करून आपली छाप पडलीय. पण हल्ली विवेक सिनेमामध्ये फारसा काही दिसत नाही… विवेक हल्ली सिनेमांत नसतो, कॉन्ट्रोवर्सीमध्ये नसतो, चर्चेतही नसतो… म्हणून काही तो गायब झालाय असं नाही… फिल्म इंडस्ट्रीमधून तो दिसेनासा झाला असला तरी दुसरीकडे त्याने त्याचं साम्राज्य निर्माण केलंय…
फिल्म इंडस्ट्रीत नाही मग विवेक करतो काय?
विवेक ओबेरॉय हा रिअल इस्टेट व्यवसायात आहे. दुबईमध्ये त्याची पार्टनरशीपमध्ये लक्झरी रिअल इस्टेट कंपनी आहे. ही कंपनी शहरातील अति-उच्च दर्जाच्या प्रकल्पांवर काम करते. सोबतच प्रयोगशाळेत विकसित केला जाणारा हिऱ्याचा ब्रँड ‘सॉलिटारियो’ (lab-grown diamond brand – solitario) देखील लाँच केलाय. या व्यवसायांसोबतच विवेकने वेगवेगळ्या सेक्टर्समधील व्यवसायांत गुंतवणूक सुद्धा केली आहे. या सळ्या व्यवसायांच्या बळावर विवेक आज 1200 कोटींचा मालक आहे!
विवेकचा सक्सेस मंत्र काय?
1200 कोटींचा मालक असलेल्या विवेक ओबेरॉयने हल्लीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपला सक्सेस मंत्र शेअर केलाय… तो म्हणाला, “जेव्हा मला कळले की मला पैसे कसे कमवायचे हे माहित आहे, तेव्हा मी ते करत राहिलो. ते खूप कठीण आणि कठीण होते. पण नंतर मला ते कसे गुंतवायचे हे समजून घ्यायचे होते आणि मी अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला.” पुढे बोलताना विवेक म्हणाला, “कॉलेज बाहेर असलेल्या एका पानवाल्याकडून मी बऱ्याच आर्थिक बाबी शिकलो. मॅनेजमेंट, फायनान्सिंग, डील्स या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो.”
मुलगा की मुलगी? कॉमेडियन भारती सिंगने परदेशात केली बाळाची लिंग तपासणी? स्वतःच सोडले मौन
टीन एजमध्येच स्टॉक मार्केटही शिकला
आणखी प्रगती करण्याच्या इच्छेने इच्छेने, मी त्याने शेअर मार्केटमध्ये अप्रेंटिसशिप केली आणि अगदी टीन एजमध्येच (पौगंडावस्थेत) असतानाच एका ब्रोकरकडून ट्रेडिंग आणि मार्केटच्या विविध पैलूंबद्दल माहिती घेतली.
“मला वाटतं की एक शहाणा माणूस त्याच्या यशाचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्या अपयशातून जास्त शिकतो.” असं म्हणत विवेकने एका ओळीत सल्ला दिला. शिवाय आपण रिअल इस्टेट मध्ये व्यवसाय करत असताना त्या जमिनीवर जाऊन शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या घरात जमिनीवर बसून व्यवहार करतो असंही विवेक म्हणाला…
लहानपणापासूनच व्यवसायात असलेला रस, त्यासाठी घेतलेली मेहनत, मिळवलेलं ज्ञान आणि जमिनीवर उतरून केलेलं काम या साऱ्याच्या बळावर विवेक आज इंडस्ट्रीमध्ये फारसा दिसत नसला तरी, त्याचं 1200 कोटींचं साम्राज्य त्याने उभं केलंय!