(फोटो सौजन्य - अकाउंट)
लोकनृत्य कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते राम सहाय पांडे यांचे मंगळवारी सकाळी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ राय लोककलाकाराचे सागर येथील रुग्णालयात निधन झाले. बुंदेलखंडमधील या कलाकाराने ६० वर्षे मृदंगमच्या सुरांनी राय लोकनृत्य लोकप्रिय केले होते. आता त्यांच्या या बातमीने शोककळा पसरली आहे.
मलायका अरोरा विरोधात वॉरंट जारी, २९ एप्रिल रोजी होणार सुनावणी; नेमकं कारण काय ?
राम सहाय यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला
वृत्तानुसार, सागर जिल्ह्यातील रहिवासी राम सहाय यांनी १८ देशांमध्ये १०० हून अधिक कार्यक्रम दिले होते. राम सहाय यांना २०२२ मध्ये देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री मिळाला. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि एक मुलगा आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब आता शोकसागरात बुडाले आहे.
बुंदेलखंड के गौरव, लोकनृत्य राई को वैश्विक पहचान दिलाने वाले लोक कलाकार पद्मश्री श्री रामसहाय पांडे जी का निधन मध्यप्रदेश और कला जगत के लिए अपूरणीय क्षति है।
लोक कला एवं संस्कृति को समर्पित आपका सम्पूर्ण जीवन हमें सदैव प्रेरित करता रहेगा। परमपिता परमेश्वर से प्रार्थना है कि… pic.twitter.com/rzu9Lg1blL
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) April 8, 2025
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकसंवेदना
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राम सहाय यांनी प्रतिकूल परिस्थितीत कला क्षेत्र स्वीकारले आणि प्रवाहाविरुद्ध आपल्या आवडीचे पालन करून अनेक कामगिरी केली.’ मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी बुंदेलखंडातील राय लोकनृत्याला भारतात तसेच इतर देशांमध्ये मान्यता दिली.