(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध अभिनेता सॉन्ग यंग-क्यू आता या जगात राहिले नाहीत. ते एका कारमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी, हा अभिनेता दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकरणात अडकला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह गंभीर अवस्थेत आढळला. मात्र, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या संदर्भात तपास सुरू आहे. तसेच अभिनेत्याबद्दल मिळालेली माहिती आपण जाणून घेऊयात.
पोलिस तपासात गुंतले
सॉन्ग यंग-क्यू आणि वयाच्या ५५ वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी अनेक के-ड्रामा चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आणि त्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, ५५ वर्षीय अभिनेता रविवारी ग्योंगी प्रांतातील योंगिन येथील एका टाउनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये कारमध्ये मृतावस्थेत आढळला. योंगिन पूर्व पोलिस स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिक वृत्त वेबसाइट कोरियाबूनुसार, सॉन्ग यंग-क्यू यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.
अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टचे झाले नुकसान
अभिनेता सॉन्ग यंग-क्यू यांना जूनमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.०८ टक्के होते. या घटनेमुळे, अभिनेत्याला अनेक अभिनय भूमिकांमधून काढून टाकण्यात आले. अनेक मोठे प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. सॉन्ग यांनी ‘द डिफेक्ट्स’साठी आधीच शूटिंग केले होते. परंतु याबाबत एक निवेदन देखील जारी करण्यात आले होते की त्यांचा स्क्रीन टाइम त्यात मर्यादित असेल.
सोनाक्षी सिन्हानंतर सुधीर बाबूचा जबरदस्त लूक रिलीज, आता ‘Jatadhara’ च्या टीझरची चाहत्यांना उत्सुकता
सॉन्ग यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल
सॉन्ग यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. दक्षिण कोरियामधील सेलिब्रिटी उच्च नैतिकतेचे पालन करतात. वादांमुळे अनेकदा तीव्र तपासणी होते आणि त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम होतो. सॉन्ग ‘बिग बेट’, ‘ह्वारंग’ आणि ‘हॉट स्टोव्ह लीग’ सारख्या लोकप्रिय के-ड्रामामधील भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने चाहते दुःखी झाले आहेत.