(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रसिद्ध गायक पी जयचंद्रन यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करत राहील. या पोस्टने सगळेच चाहते आता भावुक झाले आहेत. पी जयचंद्रन यांच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रजत दलालला Bigg Boss 18 मधून बाहेर काढणार? काय असेल मेकर्सचा नवा ट्विस्ट?
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केले
ट्विटरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जयचंद्रन यांना एक अद्भुत आवाज मिळाला होता जो विविध प्रकारच्या भावना व्यक्त करू शकत होता. ते म्हणाले, “विविध भाषांमधील त्यांचे भावपूर्ण सादरीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करत राहील. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Shri P. Jayachandran Ji was blessed with legendary voice that conveyed a wide range of emotions. His soulful renditions across various languages will continue to touch hearts for generations to come. Pained by his passing. My thoughts are with his family and admirers in this hour…
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2025
वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले
प्रसिद्ध गायक पी जयचंद्रन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गुरुवारी घरी बऱ्याच काळ राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच ते आजारी देखील असल्याचे समजले होते. जयचंद्रन हे विशेषतः मल्याळम चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चहलचा या आरजेसोबतचा फोटो व्हायरल, चाहते झाले चकित!
जयचंद्रन यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
गायक जयचंद्रन यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदीमध्ये १६ हजारांहून अधिक गाणी गायली होती. भारतीय संगीतातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि केरळ सरकारचा जे.सी. डॅनियल पुरस्कार यांचा समावेश आहे. श्री नारायण गुरु या चित्रपटातील ‘शिव शंकर शरण सर्व विभो’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.