(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन ‘हेरा फेरी ३’ चे दिग्दर्शन करणार आहेत. या फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शकाने स्वतः सोशल मीडियाद्वारे त्याच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याने फ्रँचायझीच्या कलाकार अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना बहुप्रतिक्षित सिक्वेलसाठी आमंत्रित केले होते. अक्षय कुमारने ऑफरचे स्वागत करून प्रतिसाद दिला आहे.
प्रियदर्शनने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट
अक्षय कुमारने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, प्रियदर्शनने ट्विटरवर पोस्ट केले, “तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, अक्षय. मी तुम्हाला त्या बदल्यात एक भेट देऊ इच्छितो. मी हेरा फेरी ३ करायला तयार आहे. तुम्ही हेरा फेरी करायला तयार आहात का? सुनील शेट्टी आणि परेश रावल तयार आहात का?” असे दिग्दर्शकाने लिहून अभिनेत्यांना प्रश्न उपस्थित केला आहे. या उत्तर देखील अक्षय कुमाने दिले आहे. आता या बातमीने चाहत्यांना खुश केले आहे. हेरा फेरी ३ पाहण्यासाठी ते आता खूप उत्सुक आहेत.
Sir!!! Your birthday and I got the best gift of my life. Chalo karte hain phir thodi hera pheri 🙂 @SirPareshRawal @SunielVShetty @priyadarshandir https://t.co/OmJZLgHat1 pic.twitter.com/4OCbePdglF
— Akshay Kumar (@akshaykumar) January 30, 2025
अक्षय कुमाने दिले उत्तर
अक्षय कुमारनेही दिग्दर्शकाच्या ऑफरचे उत्साहाने स्वागत करून प्रतिसाद दिला. अभिनेत्याने लिहिले, “सर… तुमचा वाढदिवस आहे आणि मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट मिळाली आहे. चला मग थोडी हेरा फेरी करूया.” असे अभिनेत्याने लिहिले आहे. यासोबतच अक्षयने त्याचा प्रसिद्ध ‘मिरॅकल मिरॅकल’ मीम देखील शेअर केला आहे. तर सुनील शेट्टीने लिहिले, “हेरा फेरी आणि काही विचार ?… चला हेरा फेरी करूया.” असे लिहून सुनील शेट्टीने देखील या प्रश्नाला प्रतिसाद दिला आहे.
Hera Pheri aur pooch pooch!!!
Lets do this #HeraPheri3@priyadarshandir @akshaykumar @SirPareshRawal #FirozNadiadwala https://t.co/7j6e0qCujY— Suniel Shetty (@SunielVShetty) January 30, 2025
परेश रावल यांनीही व्यक्त केला आनंद
याशिवाय, परेश रावल यांनी प्रियदर्शनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “प्रिय प्रियांजी, तुम्ही त्याची आई आहात ज्यांनी या जगात आनंदाचा हा दिव्य किरण आणला! या सतत हसणाऱ्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद! स्वागत आहे सर.” आणि जग पुन्हा आनंदाने भरूया.” असे म्हणून अभिनेता परेश रावल यांनी देखील ‘हेरा फेरी ३’ करण्यासाठी होकार दिला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ‘सिंडिकेट’बद्दल पसरलेल्या अफवांचे केले खंडन, पोस्ट शेअर करत म्हणाले…
पहिल्या आणि दुसऱ्या भागांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.
२००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ला कालांतराने कल्ट दर्जा मिळाला आहे. आजही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असतात. त्याचा सिक्वेल ‘फिर हेरा फेरी’ २००६ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यातही यशस्वी झाला. आता लोक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘कबीर’ देखील या घोषणेमुळे खूश झाला
हेरा फेरीचा कबीर म्हणजेच गुलशन ग्रोव्हर देखील या बातमीने खूप आनंदी दिसत होता. त्याने एका एक्स-पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. गुलशनने लिहिले, कबीरा बोलत आहे… कबीरा उत्साहित आहे… ही मी ऐकलेली सर्वात चांगली बातमी आहे. याशिवाय, गुलशनने सुनील शेट्टीला टॅग करून एक प्रश्नही विचारला. त्याने लिहिले, “भाऊ, तू कबीरला टॅग केले नाहीस? कबीर न बोलता हेरा फेरी?” असे लिहून अभिनेत्याने देखील याला प्रतिसाद दिला आहे.