Priyanka Chopra (फोटो सौजन्य-Instagram)
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आता एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अंबानी आणि मर्चंट यांच्यात भव्य लग्नसोहळा पार पडला. या लग्नात जगभरातील सेलिब्रिटीही सहभागी होताना दिसले होते, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची सुद्धा हजेरी लागली होती.
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत अनंत आणि राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी खास अमेरिकेतून भारतात आली होती. 11 जुलै रोजी हे जोडपे मुंबईत आले आणि 12 जुलै रोजी दोघांनीही देसी पद्धतीने नवविवाहित जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावली. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रियांकाने अनंत-राधिकाचे केले अभिनंदन
अनंत- राधिकाच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावल्यानंतर लवकरच प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत अमेरिकेला रवाना झाले आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत आणि लग्नात काय मिस केले ते सांगितले आहे. अभिनेत्रीने तीन फोटो शेअर केले आहेत. एक पोस्ट अनंत आणि राधिकाची आहे.
निकच्या डोळ्यात पाहते प्रियांका
एक फोटो प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा आहे. देसी गर्ल पतीच्या नजरेत मग्न झालेली दिसते आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. यादरम्यान निकने प्रियांकाचा हातही धरला आहे. दोघांचा हा फोटो खूप प्रेमाने भरलेला आणि अप्रतिम दिसत आहे.
प्रियांका चोप्राने केली ही गोष्ट मिस
प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा लेहेंगा आणि बल्गारी दागिन्यांमध्ये दिसत आहे ज्यामध्ये ती खूप जबरदस्त आणि आकर्षित दिसतेय. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, डान्स करताना तिला कोणती गोष्ट आठवली. प्रियांकाने लिहिले, “साहजिकच मला लग्नाच्या मिरवणुकीत चाट आणि वरातीत डान्स खूप आठवला… माझ्यासाठी ती खूप खास रात्र होती. माझ्या ओळखीच्या दोन दयाळू लोकांसोबत मी आनंद साजरा केला, अनंत आणि राधिका मर्चंट. देव तुमच्या नात्याला सदैव आशीर्वाद देवो.” असे तिने या पोस्टद्वारे म्हंटले आहे. सध्या या दोघांच्या लग्नातील प्रियांकाचा ‘चिकनी चमेली’ या गाण्यावरील डान्स व्यहायराल होताना दिसत आहे.