(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादही निर्माण झाला होता. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर अभिनेत्यांना अटक करण्यात आली होती परंतु काही काळाने त्याची लगेच जामीनावर सुटला झाली. यानंतर आता हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते येलमांचिली रविशंकर आणि नवीन येरनेनी यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
अल्लू अर्जुनसह निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि निर्माते येलामंचिली रविशंकर आणि नवीन येरनेनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीमियर दरम्यान पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर महिलेचा मुलगा देखील जखमी झाला परंतु त्याला ताबोडतोब रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याची तब्येत आता व्यवस्थित आहे.
असे निर्मात्यांनी याचिकेत म्हटले आहे
मात्र, निर्मात्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले की थिएटरच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ते जबाबदार नाहीत. प्रीमियरपूर्वी या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी या याचिकेत दिली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा दल तैनात केले होते, मात्र असे असतानाही ही घटना घडली. सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या होत्या तर मग त्यांच्यावर आरोप का केले जात आहेत, असा सवालही निर्मात्यांनी उपस्थित केला.
Dhurandhar: ‘धुरंधर’मधील कास्टचा फोटो लीक; रणवीर सिंग, आदित्य दिसणार लक्षवेधी भूमिकेत!
आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे
त्यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाने आज २ जानेवारी निर्मात्यांना दिलासा दिला आहे. निर्मात्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली. न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल, जेणेकरून त्यावर पुढील कारवाई करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.