(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’ सध्या चर्चेत आहे. कथेसोबतच हा चित्रपट त्याच्या संगीतासाठीही चर्चेत आहे. त्याच्या चार गाण्यांवर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. चित्रपटाच्या संगीताची एकूण किंमत 75 कोटी रुपये आहे, जी एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मिती बजेटपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया या गाण्यांमध्ये काय खास आहे. तसेच या चित्रपटाचे ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
जरागंडी
जरागंडी हे गाणे मोठ्या प्रमाणावर चित्रीत झाले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध डान्सर-कोरियोग्राफर प्रभू देवा यांनी केली आहे. गावातील 70 फूट उंच टेकडीवर या गाण्याचा सेट तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात 600 हून अधिक डान्सर्सनी काम केले आहे. या गाण्याचे शूटिंग १३ दिवस चालू होते. या गाण्यात वापरलेले कपडे पूर्णपणे इको फ्रेंडली ज्यूटपासून बनवले गेले आहेत. या कारणास्तव हे गाणे केवळ भव्यच नाही तर पर्यावरणपूरक देखील आहे.
Arman Malik: अरमान मलिकचे अखेर जुळले सूर; दीर्घकालीन गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत बांधली लग्नगाठ!
रा माचा माचा
रा माचा माचा या गाण्यात भारताच्या लोकसंस्कृतीची झलक लोकांना पाहायला मिळणार आहे. गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. या गाण्यात एकूण 1000 नर्तक सहभागी झाले होते. हे गाणे पडद्यावर भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधता साजरे करताना दिसणार आहे. हे गाणं देखील सध्या चर्चेत आहे.
ना ना हायराना
या चित्रपटातील ना ना हायराना हे गाणे खूप खास आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे भारतातील पहिले गाणे आहे जे इन्फ्रारेड कॅमेऱ्याने शूट केले गेले आहे. पाश्चात्य आणि कर्नाटक संगीताचा अनोखा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हे गाणे न्यूझीलंडमध्ये शूट करण्यात आले आहे. या गाण्याला देखील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
धोप
‘गेम चेंजर’मधील हे गाणे उर्जेने भरलेले आहे. याचे नृत्यदिग्दर्शन जानी मास्तर यांनी केले आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे यात 100 रशियन डान्सर्सनी डान्स केला आहे. या गाण्याचे शुटिंग अवघ्या 8 दिवसात पूर्ण झाले, पण तरीही परफॉर्मन्स आणि एनर्जी लेव्हलवर कोणताही परिणाम झाला नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे गाणे तयार करण्यात आले आहे.