फोटो सौजन्य- सोशल मीडिया
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही काळापूर्वी बातमी आली होती की सुकुमारचा हा चित्रपट 6 डिसेंबर 2025 ला रिलीज होणार आहे. त्यानंतर ‘पुष्पा 2’चा क्लायमॅक्स व्हिडिओ लीक झाला होता. हा सीन लीक होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आणि आता याचदरम्यान, ‘पुष्पा 2’ चित्रपटाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याने ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. एवढेच नाही तर ‘पुष्पा 2’ चित्रपटाचे रिव्ह्यूदेखील सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येथे आम्ही संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्याबद्दल बोलत आहोत ज्यांनी पुष्पा 2 बाबत एक मोठे विधान केले आहे.
‘पुष्पा 2’ चित्रपटाबद्दल बोलताना संगीतकार डीएसपी म्हणाले, ‘नुकताच मी ‘पुष्पा 2’ द रुल चित्रपटाचा पहिला भाग पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर माझे मन थक्क झाले. या चित्रपटाचा स्टोरीबोर्ड इतका मजेदार आहे की चंद्रबोस आणि मी टाळ्या वाजवत राहिलो. एक क्षण असा आला की चित्रपटात ब्रेक येतोय असे वाटले, त्याचवेळी कथेतील सस्पेन्स वाढत जातो. सुकुमारचे दिग्दर्शन सध्या शिखरावर आहे. अल्लू अर्जुनने चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. ‘पुष्पा 2′ या चित्रपटाची कमाई गेल्या वेळच्या तुलनेत खूप वर जाणार आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.’ असे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा- ‘धूम 4’ मध्ये रणबीर कपूरचा दिसणार डॅशिंग लुक, सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल!
संगीतकार देवी श्री प्रसाद यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानाकडे लोक एखाद्या चित्रपटाच्या समीक्षेप्रमाणे बघत आहेत. पुष्पा 2 चित्रपटातील दोन गाणी पुष्पा आणि सुस्की, आधीच व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत अशी प्रशंसा ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडत आहे. देवी श्री प्रसाद यांनी खुलासा केला आहे की लोकांना पुष्पा 2 मध्ये अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर ला संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.