(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुष्पा- द रुलचा ट्रेलर रविवारी बिहारची राजधानी पाटणा येथे प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमात कलाकारांचे अनेक चाहते सहभागी झाले होते. यासाठी पाटणा येथील गांधी मैदानावर निर्मात्यांनी एका भव्य लाँच कार्यक्रमाचीही योजना केली होती. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच चाहत्यांचे आवडते सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि गांधी मैदानात गोंधळ उडाला. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संबंधाचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.
अल्लू अर्जनच्या चाहत्यांवर लाठीमार झाला
17 नोव्हेंबर रोजी, हजारो लोक पाटण्यातील गांधी मैदानावर ‘पुष्पा 2’ ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या आधारे तुम्ही सहज अंदाज लावू शकता की ही प्रचंड गर्दी किती मोठी होती. पाटणा पोलिसांचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व लोकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला नाही, कारवाई फक्त त्या गटावर करण्यात आली आहे ज्यांना बॅरिकेड्स तोडून आत प्रवेश करायचा प्रयत्न केला. अशाप्रकारे, पुष्पा राजची एक झलक पाहण्यासाठी स्पर्धेच्या बदल्यात त्यांच्या चाहत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या कार्यक्रमात गर्दी एवढी होती की गांधी मैदानावर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
No, this is not a scene from any political rally, these scenes are from the trailer launch of Pushpa 2 at Gandhi Maidan, Patna. 😭 #Pushpa2 #AlluArjun pic.twitter.com/WlTGcLlb5z
— Prayag (@theprayagtiwari) November 17, 2024
‘पुष्पा- द रुल’ चित्रपटाबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा
पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांची जोडी पुष्पा २ च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पुष्पा-द रुलच्या धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, चाहत्यांमध्ये आता हा चित्रपटात पाहण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ज्यासाठी अवघे काहीच दिवस शिक्कल आहेत. पुष्पा 2 च्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की यावेळी पुष्पा राज पूर्वीपेक्षा जास्त धमाकेदार दिसणार आहे आणि आपल्या शत्रूंचा खात्मा करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.