"पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या..." 'पुष्पा २: द रूल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
अल्लू अर्जुनचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा २: द रूल’ (Pushpa 2 The Rule) चित्रपटाचा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. पटन्यामध्ये हा ग्रँड इव्हेंट पार पडला आहे. या इव्हेंटसाठी अल्लू अर्जुनचे अवघ्या देशभरातील चाहते उपस्थित राहिले आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या ह्या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
हे देखील वाचा- निखळ सौंदर्याची खाण… निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वातावरणात राशी खन्नाच्या दिलखेचक अदा
टी- सीरिजच्या युट्यूब चॅनलवर ‘पुष्पा २: द रूल’चा धमाकेदार ट्रेलर शेअर करण्यात आलेला आहे. चित्रपटामध्ये पुष्पा रक्त चंदनाच्या झाडांची तस्करी करणारा तस्कर दाखवण्यात आला आहे. त्याची ही तस्करी फक्त देशापुरतीच मर्यादित राहिलेली दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची तस्करी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुष्पाच्या स्टाईलने, त्याच्या लूकने आणि त्याच्या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पुष्पा आणि श्रीवल्लीच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. येत्या ५ डिसेंबरला ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपट रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना अनेक अनुत्तरित प्रश्नांचे उत्तरं मिळतील. ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश करण्यात आला आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.