Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Coolie Movie Download: रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका

लोकेश कनागराज दिग्दर्शित रजनीकांत यांचा कुली चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ऑनलाइन लीक झाला. यामुळे चित्रपटप्रेमींना चित्रपटगृहांऐवजी घरी बसून विनामूल्य पाहण्याचा ठरला मोह.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 14, 2025 | 06:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक
  • पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका
  • ‘कुली फ्री डाउनलोड’ शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड

Coolie Movie Download: सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘कुली’ (Coolie) चित्रपटगृहांमध्ये दाखल होताच ऑनलाइन पायरसीचा शिकार झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि कमी-रिझोल्यूशनच्या प्रती काही तासांतच बेकायदेशीर वेबसाइट्स आणि टेलिग्राम ग्रुप्सवर लीक झाल्या आहेत. यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पायरसी वेबसाइट्सवर ‘कुली’चा धुमाकूळ

‘कुली फ्री डाउनलोड’ (Coolie free download) हे शब्द सोशल मीडिया आणि सर्च इंजिनवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. Tamilrockers, Filmyzilla, Movierulez आणि Moviesda सारख्या कुप्रसिद्ध पायरसी वेबसाइट्सवर 1080p HD पासून 240p पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे. यामुळे चित्रपटप्रेमींना चित्रपटगृहांऐवजी घरी बसून विनामूल्य पाहण्याचा मोह होत आहे, जे चित्रपटसृष्टीसाठी एक गंभीर आव्हान आहे. या पायरसीमुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) आणि संपूर्ण टीमने प्रेक्षकांना केवळ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळेल.

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’

चित्रपटाबद्दल खास माहिती

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नागार्जुन, आमिर खान आणि श्रुती हासन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा देवा (Deva) नावाच्या एका माजी सोन्याच्या तस्करावर आधारित आहे, जो जुन्या सोन्याच्या घड्याळांमध्ये लपवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली हरवलेली ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो. “जर रजनीकांत परिपूर्ण नायक असतील, तर नागार्जुन या चित्रपटाचे परिपूर्ण खलनायक आहेत. चित्रपटाच्या कथेला नागार्जुन यांनी त्यांच्या अभिनयाने योग्य आधार दिला आहे.”

ऑनलाइन पायरसीचा धोका

चित्रपटाची बेकायदेशीर प्रत डाउनलोड करणे किंवा पाहणे हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. कॉपीराइट कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी ₹२ लाख पर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो. याशिवाय, पायरसी वेबसाइट्सवर मालवेअर, स्पायवेअर आणि फिशिंग लिंक्सचा धोका असतो, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते किंवा आर्थिक फसवणूक होऊ शकते. पायरसी केवळ बॉक्स ऑफिसच्या कमाईलाच नाही तर चित्रपट निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेला नुकसान पोहोचवते. त्यामुळे, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, हे कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या कामाला पाठिंबा देण्यासारखं आहे.

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी काय म्हटले?

आता, चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षक एक्स अकाउंटवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘कुली द पॉवर हाऊस, रजनीकांतची शानदार एन्ट्रीने चमत्कार केला. नागार्जुन अक्किनेनी देखील धमाका केला आहे.’

दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘पहिला भाग खूप उत्साही वाटला. नागार्जुनचा अंदाज देखील खतरनाक आहे. श्रुती हासननेही उत्तम अभिनय केला आहे. चित्रपट पाहताना खूप मजा आली.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘पहिला भाग चांगला आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या पडद्यावरच्या उपस्थितीने मने जिंकली. सिनेमागृहात चित्रपटाची खूप चर्चा रंगली.’

Web Title: Rajinikanths coolie leaked online as soon as it was released producers hit hard by piracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Bollywood
  • Rajinikanth

संबंधित बातम्या

पुतण्या अमालच्या आरोपांवर अनु मलिकने सोडले मौन, म्हणाला ‘हजार वेळा खोटे बोलल्याने ते खरे होत नाही’
1

पुतण्या अमालच्या आरोपांवर अनु मलिकने सोडले मौन, म्हणाला ‘हजार वेळा खोटे बोलल्याने ते खरे होत नाही’

‘बिग बॉस ४’ फेम सारा खानने दुसऱ्यांदा केलं लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ
2

‘बिग बॉस ४’ फेम सारा खानने दुसऱ्यांदा केलं लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ

Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज
3

Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा
4

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.