(फोटो सौजन्य- Pinterest)
चित्रपट निर्माता आदित्य चोप्राच्या आगामी ‘धूम 4’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 2004 मध्ये रिलीज झालेला ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘धूम’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता जॉन अब्राहमने खलनायकाची भूमिका साकारली होती, तर दुसऱ्या भागात हृतिक रोशनने चोराची भूमिका साकारली होती. अभिनेता आमिर खानने ‘धूम 3’मध्ये दुहेरी भूमिका साकारत खलनायकाची भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता ‘धूम 4’ मध्ये कोणता स्टार खलनायकाची भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे. अलीकडेच, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की अभिनेता शाहरुख खान YRF च्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘धूम 4’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. परंतु , आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.
रणबीर कपूर की शाहरुख खान? ‘धूम 4’ मध्ये हा अभिनेता होणार खलनायक
‘धूम 4’चे निर्माते शाहरुख खानसोबत रणबीर कपूरला खलनायकाच्या भूमिकेत कास्ट करण्याचा विचार करत आहेत. शाहरुख खानला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी काही चाहते उत्सुक आहेत, तर काहीजण या चित्रपटात रणबीर कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘धूम 4’मध्ये कोणत्या स्टारला खलनायकाच्या भूमिकेत पाहायचे आहे, याविषयी चाहते एक्स हँडलवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘यशराज फिल्म्स धूम फ्रँचायझीमध्ये प्रभास आणि रणबीर कपूरला कास्ट करण्याचा विचार करत आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगचे काम सुरू आहे.” असं त्यांनी सांगितले.
EXCLUSIVE: #Dhoom4 🔥🔥🔥
Yash Raj Films plans to cast #RanbirKapoor and #Prabhas in upcoming Dhoom Franchise ✅
Dhoom 4 will be Directed by Ayan Mukerji ✅
Scripting process is in progress ✅
This Film Broke #Hakla Life time Collection Just 4 Days ✅✅🔥 pic.twitter.com/XKfuy7TDgv
— O MaraManishi♂️ (@Santhos88817210) August 20, 2024
आणखी एका यूजरने लिहिले की, ‘धूम 4 मध्ये शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारावी अशी माझी इच्छा आहे कारण ही भूमिका त्याच्यापेक्षा चांगली कोणीही साकारू शकत नाही. मला नेहमीच शाहरुख खानला धूम फ्रँचायझीमध्ये पाहायचे होते. पण चित्रपटात रणबीर कपूर जरी खलनायक म्हणून आला तरी मला राग येणार नाही कारण शाहरुख खाननंतर तोच या पात्रासाठी योग्य आहे.’ असे त्या यूजरने लिहिले.
हे देखील वाचा- ‘स्त्री 2’ ब्लॉकबस्टर होताच निर्मात्यांनी ‘स्त्री 3’ ची केली घोषणा, अभिषेक बॅनर्जी म्हणाला- ‘स्क्रिप्ट तयार आहे’
अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राचे पात्र बदलू शकते
अलीकडेच ‘धूम 4’मध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्या पात्रांमध्येही बदल होऊ शकतात, अशा बातम्या आल्या होत्या. धूम 4 मध्ये अभिषेक बच्चनच्या जागी अक्षय कुमार दिसणार आहे, तर राजकुमार रावला उदय चोप्राची जागा मिळाली आहे, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. चित्रपटात नयनतारा आणि कतरिना कैफ यांच्या कास्टिंगचाही दावा करण्यात आला होता.