(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘गदर 2’ तसेच शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही मागे टाकले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ ने अवघ्या 7 दिवसात जगभरात 401 कोटींची कमाई केली आहे. मात्र, ‘स्त्री 2’च्या शेवटी असलेला सस्पेन्स पाहता आता ‘स्त्री 3’ कधी रिलीज होणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. याचदरम्यान या चित्रपटात ‘जना’ ची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने ‘स्त्री 3’ चित्रपटाबद्दल मोठे अपडेट सांगितले आहे.
अभिषेक बॅनर्जीने ‘स्त्री 3’ बद्दल सांगितले
अभिनेता अभिषेक बॅनर्जीने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘स्त्री 3’ची तयारी सुरू झाली असून चित्रपटाची स्क्रिप्टही काही प्रमाणात तयार आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ‘स्त्री 3’ ला ‘स्त्री 2’ बनायला जितका वेळ लागला तेवढा वेळ लागणार नाही. या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काही भाग तयार झाले असून हा चित्रपट ‘स्त्री 2′ पेक्षाही मजेशीर असणार आहे.’ असं अभिनेत्याने सांगितले. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ चित्रपटातील अभिषेक बॅनर्जीची व्यक्तिरेखा खूप मनोरंजक आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात मोठ्याने हसायला मिळाले आहे.
हे देखील वाचा- मनोज बाजपेयींनी 11 वर्षांपूर्वीचे आलिशान अपार्टमेंट कोट्यावधींना विकले, 6.40 कोटी होती किंमत!
‘स्त्री 2’मध्ये सरकटेची दहशत दिसत आहे.
‘स्त्री 2’ हा मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात स्त्री नावाच्या डायनचा धोका चंदेरीवर होत असतानाच दुसऱ्या भागात सरकटेची दहशत चंदेरीमध्ये पाहायला मिळाली. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय स्त्री २ या चित्रपटामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘छलवा’ची भूमिका साकारली असून, ‘स्त्री’ची भूमिका अभिनेत्री भूमी राजगौरने केली आहे. अक्षय कुमार, वरुण धवन आणि तमन्ना भाटिया या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत आहेत. ‘स्त्री 2’ मधील तमन्ना भाटियाचा स्पेशल डान्सदेखील चाहत्यांना खूप आवडला आहे.