(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘रंगताली २०२३’ च्या भरघोस यशानंतर आता ऐश्वर्या मजमुदार सलग दुसर्या वर्षी बोरीवलीतील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात आपल्या आवाजाची जादू दाखवण्यासाठी आली आहे आणि गरबा रसिक ऐश्वर्याच्या तालावर बेधुंदपणे थिरकत आहेत तसेच या गरब्याच्या नादाने बोरीवली दुमदुमत आहे, देवीच्या भक्तिरसात लोक रंगून जात आहेत. विशेष म्हणजे एकीकडे गरब्याच्या तालावर थिरकत असताना दुसरीकडे व्हीआयपी आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीने गरबा रसिकांचा जल्लोष द्विगुणित होत आहे.
रविवारी भारत सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार माननीय श्री. पियुष गोयल आणि गुजराती नाट्य जगताचे सुपरस्टार सिद्धार्थ रांदेरिया यांनी उपस्थित राहून गरबा रसिकांना प्रोत्साहन दिले. आता येणार्या काही दिवसांत आणखी लोकप्रिय सेलिब्रिटी आणि लोकमान्य नेता आणि अभिनेता या सोहळ्याला भेट देऊन लोकांचा उत्साह वाढवणार आहेत. या विशेष आकर्षणामुळे दररोज हजारो लोक या नवरात्रौत्सवाला भेट देत असून अगदी\ अल्पकाळातंच या रंगताली नवरात्रैत्सवाची चर्चा सगळीकडे होत आहे.
तारामती चॅरिटेबल फाउंडेशन, सुरभी ग्रुप, यश एंटरटेनमेंट आणि पाम इंडियनद्वारे आयोजित ‘रंगताली’ गरबा उत्सवाचे हे दुसरे यशस्वी वर्ष आहे. राज प्रकाश सुर्वे, पंकजभाई कोटेचा, मितुलभाई शाह, विपुलभाई शाह यांनी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली असून मागाठाणेचे माननीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आशीर्वादामुळे हा सोहळा पार पडत आहे.
ऐश्वर्या मजमुदारने त्याच्या आवाज गाणी गाऊन चाहत्यांना खुश केल. त्यांचा आवाज ऐकून गरबा रसिक मंत्रमुग्ध होऊन गरब्याच्या तालावर स्वच्छंदपणे नाचू लागले. अद्भुत, अद्वितीय आणि अकल्पनीय असंच या सोहळ्याचं वर्णन करावं लागेल. या गरब्याचं वैशिष्ट्य म्हणजे गरबा रसिकांना इथे सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी आयोजकांनी विशेष काळजी घेतली आहे. इथली सिक्योरिटी इतकी उत्तम आहे की स्त्रियांनाही या ठिकाणी सुरक्षित वाटते आणि कुटुंबासोबत आबालवृद्ध सुद्धा निःसंकोचपणे गरब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. तसेच इथे चांगली सुविधा पुरवण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसल्यामुळे गरबा रसिकांच्या चेहर्यावरचे समाधान पाहण्यासारखे असते.
हे देखील वाचा- टायगर श्रॉफ रणवीर सिंगचा मॅन क्रश? रणवीर म्हणाला, ‘संपूर्ण जगात त्याच्यासारखं खास कोणीही नाही’
मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी बोरीवलीमध्ये अशा प्रकारचा अद्वितीय नवरात्रौत्सव होत आहे. ज्याप्रमाणे दोन नद्यांचं संगम होतं, त्याप्रमाणे इथे मराठी आणि गुजराती संस्कृतिचा मिलाप होताना दिसतो. इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून, विविध स्तरातील लोक एकत्र येऊन देवीच्या भक्तिरसात रंगून जातात. त्यामुळे अनेक गरबा रसिकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला पाहिजे आणि सहकुटुंब या नवरात्रौत्सवाला भेट देऊन या सोहळ्याची शान वाढवली पाहिजे.