(फोटो सौजन्य - अकाउंट)
हिंदी टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या ‘लाफ्टर शेफ’ च्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्रीने भारती सिंगच्या पॉडकास्ट मध्ये संवाद साधला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने मुंबईतील तिचे घर गमवाल्याचा आणि कोटीची रुपयाची फसवणूक झालेचे उघड केले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आपण आता जाणून घेणार आहोत.
‘मी तामिळनाडूत आहे, दाखवा येऊन…’ कुणाल कामराने शिवसेना समर्थकांना दिले खुले आव्हान, Video Viral
भरती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीनी नुकतीच हजेरी लावली होती. याचदरम्यान तिने मुंबईतील पहिलं घर गमावल्याबाबत सांगितले अभिनेत्री ,म्हणाली की, मी माझ्या आयुष्यातील एकदम वाईट काळ जगला आहे. मी वर्षांनुवर्षे, तसेच २ वर्ष काहीच काम केले नाही आहे. मी खूप चिंता आणि नैराश्यातून माझ्या आयुष्यात पुढे गेली आहे. मी माझ्या किशोरावस्थेत खूप दुःखाला सामोरे गेली आणि अनेक निर्णय चुकीचे घेतले आहेत. परंतु जेव्हा आता मी मागे वळून पाहते तेव्हा मला समजले की अनेक चुकीच्या निर्णयांनी मला चांगला मार्ग आणि खूप काही शिकवले आहे.’ असं ती म्हणाली.
यानंतर अभिनेत्रीने सांगितले की तिची पहिली मालिका ‘छोटी बहू’ यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. आणि यानंतर तिने खूप पैसे कमावले आणि त्याची गुंतववूक देखील केली. अभिनेत्री म्हणाली की, ‘मालिकेमुळे प्रसिद्धी आणि पैसे मिळाल्यानंतर मला अनेक लोक म्हणले की तू हे खरेदी केलं पाहिजे, गाडी घेतली पाहिजे, घर घेतला पाहिजे, मी म्हणाली की ठीक आहे, सगळं घेतला मी आणि आयुष्यात खूप एन्जॉय देखील केलं.’ अभिनेत्रीने असं ही सांगितले की तिच्या कुटूंबामधील पहिली महिला आहे जी जास्त कमावते आणि स्वतःची हौसमौज पूर्ण करते.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘मी मुंबईमध्ये १० वर्ष काही काम नाही केले कारण मी एक घर खरेदी केले होते. मी माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा मोठा निर्णय घेतला होता. आणि हा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटचा निर्णय चुकीच्या माणसाच्या हाती गेला. ज्याची मला कल्पनाही नव्हती. मला हे घर ९० दिवसांच्या आत मिळणार होते. परंतु तो माणूस माझे सगळे पैसे घेऊन फरार झाला. यानंतर मी ३ वर्ष त्याच्या शोधात होती परंतु ती माणूस सापडला नाही. माझे सगळे पैसे पाण्यात गेले आणि माझे घर देखील मला मिळाले नाही.’ असा खुलासा अभिनेत्री या शोमध्ये करताना दिसली आहे.
यानंतर अभिनेत्रीने खूप मेहनत घेतली, काम सुरु केले. दिवसाला अभिनेत्री २ शो करत होती असं तिने सांगितले. आणि पुन्हा कामाला सुरुवात करून पैसे जमावण्यास सुरुवात केली आणि ते सगळं विसरून आयुष्यात पुढे जात राहिली. रुबिना दिलैकचा हा खडतर प्रवास ऐकून चाहते देखील चकित झाले आहेत आणि तिच्यापासून प्रेरणा घेत आहेत. सध्या रुबिना दिलैक ‘लाफ्टर शेफ’ च्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे.