(फोटो सौजन्य - अकाउंट)
टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘भाभी जी घर पर है’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु यावेळी शोमधील हास्य आणि विनोदांबद्दल नाही, तर या शोच्या लेखकाने जगाचा निरोप घेतला आहे. २३ मार्च रोजी सिकंदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज बऱ्याच काळापासून आजारी होते आणि रविवारी त्यांचे निधन झाले. अभिनेत्री शिल्पा शिंदेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच रुग्णालयावरही अभिनेत्रीने आरोप केले आहेत. आता संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत.
IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी ‘गुड न्यूज’; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
मनोज संतोषी यांना काही काळापूर्वी यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. टीव्ही शो ‘एफआयआर’ फेम अभिनेत्री कविता कौशिक यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले होते. मनोजला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि, कर्करोगाशी दीर्घ लढाईनंतर २३ मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री शिल्पा शिंदेने रुग्णालयावर आरोप केले
४९ वर्षीय मनोज संतोषी यांना यकृताच्या कर्करोगाने ग्रासले होते ज्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना अनेक समस्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे यकृत प्रत्यारोपण होणार होते पण अनेक समस्यांमुळे ते होऊ शकले नाही आणि त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली आणि त्यांचे निधन झाले. मनोज यांच्या यकृताच्या कर्करोगाशी लढताना त्यांच्यासोबत असलेली अभिनेत्री शिल्पा शिंदेने इंडिया टुडेशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला. अभिनेत्रीने डॉक्टर आणि रुग्णालयावर सहकार्याचा अभाव आणि निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तिला वाटते की त्यांच्या निष्काळजीपणामुळे मनोज यांनी आपला जीव गमावला आहे.
‘मी तामिळनाडूत आहे, दाखवा येऊन…’ कुणाल कामराने शिवसेना समर्थकांना दिले खुले आव्हान, Video Viral
टीव्ही विश्वात शोककळा पसरली
मनोज संतोषी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिका लिहिल्या आहेत. या यादीत ‘हप्पू की उलटन पलटन’, ‘एफआयआर’, ‘जिजाजी छत पर’, ‘मॅडम मे आय कम इन’ आणि ‘भाभी जी घर पर हैं’ सारखे उत्तम शो समाविष्ट आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हे शो आवडले. आता त्याच्या जाण्याने त्याचे चाहतेही खूप धक्का बसला आहे.ते त्यांच्या आवडत्या शोच्या लेखकांना श्रद्धांजली वाहत आहे.