(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जानेवारीमध्ये सैफ अली खानवर त्याच्याच घरात चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या ३ महिन्यांतच, अभिनेत्याने कतारमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. पतौडी पॅलेस आणि वांद्रे येथील घरानंतर आता सैफ अली खान आणखी एका आलिशान मालमत्तेचा मालक बनला आहे. त्याच्या नवीन स्वप्नातील घराबद्दल बोलताना, अभिनेत्याने कतार घरचे सौंदर्य आणि सुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे.
सैफ अली खानने कतारमधील द पर्ल येथे असलेल्या ‘द रेसिडेन्सेस ॲट द सेंट रेजिस मार्सा अरेबिया आयलंड’ या आलिशान मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. अल फरदान ग्रुपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, सैफने या ठिकाणाबद्दल आकर्षित होण्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘सुट्टीच्या घराचा किंवा दुसऱ्या घराचा विचार करताना… माझ्या मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे ते माझ्या घरापासून खूप दूर नसावे आणि दुसरे म्हणजे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ठिकाण सुरक्षित असावे आणि तिथे राहणे चांगले वाटले पाहिजे.’ असं त्याने म्हटले.
“मतांसाठी ५०० रुपये घेणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये…”, म्हणणाऱ्या ट्रोलरची शालूने केली कान उघडणी
नवीन घर खूप छान आहे – सैफ अली खान
अभिनेता पुढे म्हणाला की, ‘बेटाच्या आत एका बेटाची कल्पना देखील खूप नेत्रदीपक आणि सुंदर आहे आणि ते खरोखरच राहण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे’. सैफच्या मते, तुम्ही तिथे असताना काय विचार करत आहात हे खूप महत्वाचे आहे.’ असं म्हणून अभिनेत्याने त्याच्या सुंदर नवीन घराचे कौतुक केले आहे. आणि हे ठिकाण अभिनेत्याला चांगलेच आवडले आहे.
शूटिंगसाठी कतारला गेला होता अभिनेता
सैद पुढे म्हणाला की, तो काही शूटिंगसाठी कतारला गेला होता आणि तो तिथे कामासाठी राहिला होता, त्या दरम्यान हे ठिकाण त्याच्या मनाला स्पर्शून गेले. हे ठिकाण लक्झरी आणि गोपनीयता दोन्ही देते. याशिवाय, तिथे राहताना जेवण आणि पेय खूप चांगले आहे. सैफ म्हणतो की त्याने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
श्रेया घोषालनंतर आता सोनू निगमची फसवणुक; चाहत्यांना दिले काळजी घेण्याचे आवाहन, नेमकं काय प्रकरण?
आता जर आपण व्यावसायिक आघाडीबद्दल बोललो तर, सैफ अली खान लवकरच ‘ज्वेल थीफ’मध्ये दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात तो कुणाल कपूर आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत दिसणार आहे. सैफसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना कुणाल कपूर म्हणाला की ‘तो कधीही सेटवर वेळेवर येत नाही.’ अशी त्याने मजेशीर बाब अभिनेत्याबद्दल शेअर केली आहे.