Fandry fame shalu aka Rajeshwari Kharat gave reply to trollers after she converted to christian
मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने नुकताच बाप्तिस्मा विधी पूर्ण करत, ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केले. बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. बाप्तिस्मा या विधीच्या माध्यमातून एखादी व्यक्ती ख्रिस्ती धर्मात औपचारिकरित्या सामील होतो. दरम्यान, राजेश्वरीने बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावर राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याची चर्चा सुरु झाली होती. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं. दरम्यान, धर्मांतरण केल्यानंतर होतं असलेल्या ट्रोलिंगला राजेश्वरी खरातने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलंय.
श्रेया घोषालनंतर आता सोनू निगमची फसवणुक; चाहत्यांना दिले काळजी घेण्याचे आवाहन, नेमकं काय प्रकरण?
राजेश्वरीने ‘ईस्टर संडे’च्या दिवशी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केले. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. धर्मांतरण केल्यानंतर राजेश्वरीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत राजेश्वरी म्हणते, “निवडणुका- प्रत्येकी ५०० रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देवमाणूस.. हे आज जात/ धर्म शिकवायला आले आहेत, तुमचं स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघं बरोबर किंवा दोघंही चुकीचे,” असं तिने लिहिलंय. त्याचसोबतच या पोस्टच्या अखेरीस तिने एक टीपसुद्धा लिहिली आहे. “टीप: माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती”, असं तिने म्हटलंय.
शुभांगी अत्रेच्या नवऱ्याचं निधन; २ महिन्यांआधीच झाला होता घटस्फोट, ‘या’ आजाराने गमवावा लागला जीव!
राजेश्वरीने ही इन्स्टा पोस्ट काही वेळातच डिलीट केली, मात्र त्याआधीच ती पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. एकाने लिहिले- ‘तो तुझा किंवा तुझ्या नेत्यांचा भ्रम आहे.’ तर दुसऱ्यांनी लिहिले, ‘जन्म जर ख्रिश्चन कुटुंबातला आहे तर पुन्हा धर्म स्वीकारण्याचे लॉजिक काय?’ तर आणखी एकाने लिहिले की- ‘राजेश्वरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले नाहीत. नाहीतर तिने असं पाऊल उचलला नसतं.’ राजेश्वरी खरातही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटातून तिने मराठी इंडस्ट्रीत डेब्यू केलं. तिने त्या चित्रपटात ‘शालू’ भूमिका साकारली आणि तिला प्रसिद्धी मिळाली. तिची चाहत्यांमध्ये ओळख राजेश्वरी नावाने नाही तर, शालू नावानेच ओळख आहे. तिला पहिल्याच चित्रपटाने प्रसिद्धीझोतात आणलं. त्यानंतर तिने ‘पुणे टू गोवा’ आणि ‘आयटमगिरी’ (2017) या चित्रपटांमध्येही काम केले. राजेश्वरीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण केली आहे. राजश्वरी खरातने इयत्ता नववीत असताना अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.