
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
२०२५ हे वर्ष बॉलीवूडसाठी अप्रत्याशित ठरले आहे. जिथे मोठ्या बजेटचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत, तिथे कमी बजेटच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.अशाच एका चित्रपटाचे नाव आहे ‘सैयारा’, जो २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा रोमँटिक चित्रपट ठरला. जगभरातील कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट २०२५ च्या ‘टॉप ३’ मध्ये समाविष्ट आहे. थिएटरमध्ये हिट झाल्यानंतर, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
अहान पांडे आणि अनीत पड्डाने “सैयारा” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांना स्टार दर्जा मिळवून दिला.भारतामध्ये, सैयाराने तब्बल ३२९.७२ कोटीची कमाई केली. जगभरातल्या कमाईत या चित्रपटाने ५७०.३२ कोटीचा टप्पा गाठला. या यशासह, सैयारा २०२५ सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तिसऱ्या चित्रपटाची ओळख झाली आहे.
चित्रपटातील अभिनय, संगीत आणि कथा या सर्व घटकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले असून, अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा भविष्यकालीन करिअरसाठी हा भक्कम पाया ठरला आहे.”सैयारा” या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
४०-५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा १४ पट कमाई करून निर्मात्यांनाही आश्चर्यचकित केले. यशराज फिल्म्स बॅनरखाली निर्मित “सैयारा” चे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर नंतर, मोहित सुरीने अहान आणि अनितच्या रूपात बॉलिवूडला एक नवीन जोडी दिली आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पाहताना प्रेक्षक रडताना दिसले.चित्रपटाची प्रेमकथा खरोखरच हृदयस्पर्शी होती. म्हणूनच, बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केल्यानंतर, तो लवकरच नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत आला.
मोहित सूरींच्या या चित्रपटातील संगीत हा त्याचा एक मोठा फायदा आहे. मिथुन, सचिन-परंपरा, विशाल मिश्रा, तनिष्क बागची आणि इतर संगीतकारांनी दिलेले गाणी खूपच सुंदर आणि मनाला भिडणारे आहेत.चित्रपटातील ‘धुन’ हे गाणे आधीच खूप लोकप्रिय झाले आहे. पडद्यावर ते ऐकताना आणि पाहताना खरोखर जादूची अनुभूती येते. संगीतामुळे कथेला आणि चित्रपटाला एक वेगळी उंची मिळाली आहे.