फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 : लोकप्रिय टेलिव्हिजन शो बिग बॉस 18 सध्या चर्चेत आहे. आता हा शो दिवसेंदिवस आपल्या फिनालेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे या शोबद्दल सर्व प्रकारच्या चर्चा रंगणार हे साहजिकच आहे आणि सर्वजण फिनालेचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सलमान खानचा वाढदिवस आहे, त्यामुळे साहजिकच ‘वीकेंडचा वार’ या शोमध्ये काहीतरी खास असणार आहे. चला जाणून घेऊ या शोमध्ये आता काय विशेष घडणार आहे?
वास्तविक, बिग बॉसशी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या BiggBoss_Tak या X खात्याने वीकेंड का वारशी संबंधित अपडेट शेअर केले होते. या पोस्टमध्ये विकेंडच्या वॉरमध्ये सलमान खानच्या वाढदिवशी खास सेलिब्रेशन करण्यात येणार आहे असे लिहिले आहे, ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सलमानच्या कुटुंबीयांना बोलावण्याची योजना रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर कलर्सच्या अकाउंटवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये मिक्का सिंह सलमान खानच्या ग्रँड सेलिब्रेशनला येणार आहे.
Bigg Boss 18 : अविनाश मिश्राला प्रेमात धोका, सलमान खानने इशा सिंहच्या बॉयफ्रेंडचा केला खुलासा
मिक्का सिंह आल्यानंतर कॉमेडियन कृष्णां अभिषेक आणि सुदेश लेहरी सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. सुदेश लेहरी हे मिक्का सिंहच्या अवतारात येणार आहेत. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामध्ये असलेले स्पर्धक सलमान खानसाठी खास डान्स करताना पाहायला मिळणार आहेत.
We can’t keep calm, It’s Salman Khan’s Birthday celebration! Entertainment ko dene sur aur masti ka touch, aa rahe hai Mikka Singh. 😍🥳
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.#BiggBoss18 #BiggBoss #BB18… pic.twitter.com/vqbp8u71wO
— ColorsTV (@ColorsTV) December 28, 2024
या विकेंडच्या वॉरमध्ये मजा मस्ती तर होणार आहेच, त्याचबरोबर सलमान खान घरातल्या सदस्यांची शाळा घेणार आहे. यामध्ये कशिश कपूर आणि अविनाश मिश्रा यांचा गाजलेल्या मुद्द्यावर सलमान खान कशिश कपूरची क्लास घेणार आहे. एवढेच नव्हे तर इशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित करताना दिसणार आहे.
रविवारच्या भागामध्ये विकेंडच्या वॉरला बिग बॉस सिझन १४ ची विजेती रुबिना दिलेक आणि उपविजेता राहुल वैद्य देखील घरामध्ये येणार आहे. त्यामुळे या दोघांना आमनेसामने पाहायला खास मज्जा येणार आहे. सिझन चौदामध्ये या दोघांचे प्रेक्षकांनी शत्रुत्व पहिला होत त्यानंतर ते पहिल्यादाच एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये सारा खानला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या आठवड्यामध्ये तिचे कृत्य आणि तिने केलेले भांडणामुळे प्रेक्षकांनी तिला नापसंत केले.