
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि ॲक्शनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. चाहते नेहमीच त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत उत्सुक असतात, आणि सध्या सलमान खान आगामी देशभक्तिपूर्ण वॉर फिल्म ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटासाठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. हा चित्रपट 2020 मध्ये भारत-चीनदरम्यान लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या वास्तविक संघर्षावर आधारित आहे. तसेच या चित्रपटामध्ये तंगडी स्टारकास्ट देखील पाहायला मिळणार आहे.
सलमान खानने या चित्रपटाचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यामधील त्याचा धडाकेबाज लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान, दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी नुकताच एक बिहाइंड-द-सीन (BTS) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, यामुळे ‘बॅटल ऑफ गलवान’मधील सलमान खानच्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. आणि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
KD: The Devil चा अॅक्शनने भरलेला टीझर रिलीज, संजय दत्तच्या ॲक्शनने उडवली खळबळ !
या BTS व्हिडिओ क्लिपमध्ये एक धुसर छायाचित्र दिसते आहे जो सलमान खान असल्याचे भासते. व्हिडिओमध्ये अॅक्शन कोरिओग्राफीची जोरदार रिहर्सल सुरू असल्याचे पाहायला मिळते. जरी सलमान खानचे नाव किंवा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, तरी चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की हे दृश्य ‘बॅटल ऑफ गलवान’साठीच आहे. “प्रॅक्टिसमुळेच परिपूर्णता येते, नो पेन नो गेन…” असे लिहून हा व्हिडीओ दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, चाहते आता अंदाज लावत आहेत की सलमान खान नक्की एक वेगळ्या आणि गभीर भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये नुकतीच अभिनेत्री चित्रांगदा सिंगची एन्ट्री झाली आहे. ज्याची घोषणा दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी केली आहे. सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ ही फिल्म 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीवर आधारित आहे. या संघर्षात दोन्ही देशांचे जवान शहीद झाले होते. विशेष म्हणजे, या संघर्षात बंदुकींचा वापर झालेला नव्हता, कारण त्या भागात शस्त्रास्त्र वापरण्यावर बंदी होती. यामध्ये लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर करत शौर्यपूर्ण लढाई झाली होती. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट केवळ एक वॉर फिल्म नसून, भारतीय जवानांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा आहे. सलमान खान या चित्रपटात कशा प्रकारे झळकतो, हे पाहणे आता सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरत आहे. ही एक अशी कथा आहे जी प्रत्येक भारतीयाने अनुभवावी आणि जाणून घ्यावी.