(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानचे शूटिंग शेड्युलप्रमाणेच सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या आगामी ‘इंशाअल्लाह’ चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटाची शूटिंग ५ वर्षाआधीपासून सुरु करण्यात आली होती. मात्र, काही रचनात्मक मतभेदांमुळे ‘इंशाअल्लाह’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान या चित्रपटाबाबत आलियाला विचारले असता तिने या चित्रपबद्दल सांगितले आहे.
‘इंशाअल्लाह’मध्ये ही असेल आलिया भट्टची भूमिका
‘जिगरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आलिया भट्टने ‘इंशाअल्लाह’ चित्रपटाबाबत मौन सोडले. आलिया म्हणाली की, चित्रपटाची कथा जबरदस्त आहे आणि तिची व्यक्तिरेखाही उत्कृष्ट आहे. ती म्हणाली, ‘मला आशा आहे की इंशाअल्लाह चित्रपट बनवला जाईल कारण ही खूप चांगली कथा आहे.’ जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, सलमान चित्रपटात मध्यमवयीन उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे? तर हा प्रश्न ऐकून अभिनेत्री हसली आणि म्हणाली, ‘ती याविषयी आत्ताच काही बोलणार नाही.’
संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘इंशाअल्लाह’ बनणार
सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर ‘इंशाअल्लाह’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहेत. या चित्रपटाची घोषणा 2019 मध्ये झाली होती. आलियासोबत सलमान खाननेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट करून चित्रपटाची घोषणा केली होती.
हे देखील वाचा – राजकुमार हिरानीने ‘मुन्नाभाई 3’ चित्रपटाची स्क्रिप्ट केली पूर्ण, मुन्ना आणि सर्किट पुन्हा गाजवणार बॉक्स ऑफिस!
मात्र संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यातील क्रिएटिव्ह मतभेदांमुळे हा चित्रपट थांबवावा लागला. अभिनेत्री आलिया भट्टबद्दल बोलायचे तर नुकताच तिचा ‘जिगरा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलियासोबत अभिनेता वेदांग रैना दिसणार आहे. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि वेदांग रैना भाऊ-बहिणीच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.