
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्याचे पूर्वीचे अनेक नातेसंबंध अनेकदा चर्चेचा विषय बनले आहेत. यापैकी एक म्हणजे सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली, जिने अनेकदा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अभिनेत्री सोमी अली हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “सलमान खान माझ्या आयुष्यातून गेल्यानंतरही मला एकटं सोडत नाहीये. 2025 मध्येही तो मला धमकावत आहे. माझा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या सलमानने मला एका अनोळखी नंबरवरून फोन केला आणि म्हणाला ‘जर तू माझ्याविरुद्ध काही बोललंस, तर मी काय करू शकतो हे तुला माहीत आहे.’ आणि त्याने तसं वागूनही दाखवलं.”
तिने पुढे सांगितले, “त्याने मला बॉलिवूडमधून बॉयकॉट केलं आहे. बॉलिवूडमधलं कोणीच माझ्याशी बोलत नाही, माझे मित्रही माझ्यापासून दूर पळतात.”
सोमी म्हणाली, “या माणसाने त्याची टीआरपी, रेटिंग्स आणि सर्व काही गमावलं आहे. पण तरीही तो माझा पाठलाग सोडत नाहीये. तो मला त्रास देतो, मी या माणसाशी ब्रेकअप केलं कारण 1998 मध्ये त्याने माझी फसवणूक केली होती. पण आता, 2025 मध्येही तो दुबईला जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटतो. हे तो मुद्दाम करतो.” ती पुढे म्हणाली, “त्याला माझी काळजी आहे म्हणून तो हे करत नाही, तर मला दुखवायची इच्छा आहे.”
Chikiri Chikiri Song Out: “राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीत ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!”
ऐश्वर्या रायसोबतच्या नात्यापूर्वी सलमान खानचे अभिनेत्री सोमी अलीसोबत संबंध होते. असे म्हटले जाते की ते दोघे एकत्र राहत होते आणि लग्न करण्याच्या तयारीत होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि सोमी अली १९९१ ते १९९९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे अफेअर आठ वर्षे चालले. सोमी अलीने सलमान खानला पहिल्यांदा प्रपोज केले होतो आणि त्यानंतर त्यांचे नाते सुरू झाले.