(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या भाऊ इब्राहिम अली खानसोबत पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला. दिल्लीतील छतरपूरमधील ‘संस्कृती ग्रीन्स’ या निसर्गरम्य ठिकाणी दोघांनी प्रसिद्ध डिझायनर अभिनव मिश्रा यांच्या पोशाखात शोस्टॉपर म्हणून लक्ष वेधून घेतलं.
या रॅम्प वॉकमध्ये दोघा भावंडाचे सुंदर नातं सर्वांना दिसलं. रॅम्पवर दिलेला परफॉर्मन्स पाहून उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. सध्या सोशल मीडियावरही हे खास क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इब्राहिमने या रॅम्प वॉकसाठी कतान सिल्कची शेरवानी घातली होती, तर सारा अली खानही याच टोनमध्ये डिझायनर लेहंग्यामध्ये खुलून दिसत होती.दोघांचा हा पहिला रॅम्प वॉक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, त्यांच्या लूक आणि बॉन्डिंगने चाहते भारावून गेले आहेत.
रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या अफवांदरम्यान विजय देवरकोंडा स्पॉट; चाहत्यांना दिसली एंगेजमेंट रिंग
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक अनुभव शेअर केला आहे. डिझायनर अभिनव मिश्रा यांच्या खास मिरर वर्क डिझाईनमध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर चालताना ती अधिकच खुलून आली होती.
साराने लिहिलं, “अभिनव मिश्रा यांनी खास हाताने तयार केलेल्या या मिरर वर्क डिझाईनमुळे मी अधिकच सुंदर वाटू लागले. रस्टी ऑरेंज रंगाच्या पोशाखात मला असं जाणवलं की जणू मी कला, शिल्प आणि उत्सवाच्या एका जादुच्या दुनियेत प्रवेश केला आहे. ‘द श्राइन’चा भाग होणं हे माझ्यासाठी एक आनंददायी क्षण होता.”
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचा ‘बाल्ड लूक’; चेहऱ्यावर हसू कायम
वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत सारा आणि इब्राहिम दोघंही आता अभिनय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. सारा अली खान हिने २०१८ मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
तर इब्राहिम अली खान याने यंदा दोन ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये ‘नादानियां’ आणि ‘सरजमीन’ आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.