
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मुकेश भट्ट निर्मित “सावी” या चित्रपटामुळे बॉलीवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आलिया भट्टच्या “जिगरा” या चित्रपटाला “सावी” ची कॉपी असे म्हटले होते. त्यानंतर काही माध्यमांच्या वृत्तानुसार, मुकेश भट्टने दिव्याच्या या हालचालीला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते, असे म्हणत, “आलियाला कॉपीची गरज नाही.” हे ऐकून दिव्या खोसला संतापली आणि तिने मुकेश भट्टसोबतचा फोन कॉल लीक केला आहे. या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे.
भारताचे Miss Universe 2025 चे स्वप्न राहिले अपुरे, २२ वर्षीय मनिका विश्वकर्मा टॉप १२ मधून पडली बाहेर
दिव्याने मुकेश भट्टसोबतचा फोन कॉल केला लीक
दिव्या खोसलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुकेश भट्टसोबतचा हा फोन कॉल शेअर केला. त्यामध्ये ती मुकेश यांना विचारते की “सावी” आणि “जिगरा” यांच्यातील वादाबद्दल त्यांचे तिच्याविरुद्ध का मत होते. यावर मुकेश भट्ट यांनी उत्तर दिले की, “मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही आहे. हे सर्व नियोजित आहे. मी असे का करेन? हे तुमच्या वाढदिवशी जाणूनबुजून करण्यात येणारी गोष्ट आहे. पण त्याचा स्वतःच्या मनावर कोणताही परिणाम करून घेऊ नका.” असे त्यांनी म्हटले आहे.
“हे हृदयद्रावक आहे.” – दिव्या खोसला
फोन कॉल शेअर करताना, दिव्याने कॅप्शनमध्ये मुकेश भट्ट यांना खलनायक म्हणून दाखवणाऱ्या लेखाच्या लेखकांविरुद्ध तिचा राग व्यक्त केला आहे. दिव्याने लिहिले, “या खुलाशाने मला धक्का बसला आहे. मला अलीकडे जे कळले ते अस्वस्थ करणारे आणि हृदयद्रावक आहे. जड अंतःकरणाने, मला वाटते की हे सत्य लोकांसमोर आणणे महत्वाचे आहे, विशेषतः आपल्या चित्रपट उद्योगात लॉबिंग आणि गेटकीपिंगचा फटका सहन करणाऱ्या सर्व कलाकार आणि चाहत्यांसाठी.”
ईशा केसकर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून पडली बाहेर? नवी अभिनेत्री येताच ठोकला रामराम
अभिनेत्रीने पुढे काय लिहिले, “दुर्दैवाने, मुकेश भट्ट आणि माझ्यामधील संभाषण शेअर करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही जेणेकरून लोकांना स्वतःला ऐकू येईल की काही गट करिअर कसे खराब करण्याचा आणि खऱ्या प्रतिभेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. हे वर्तन अस्वीकार्य आहे आणि ते सामान्य मानले जाऊ शकत नाही. बोलण्याची आणि उद्योगातील माफियाचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मी माझा आवाज उठवीन आणि प्रतिकार करेन…” असे त्यांनी म्हटले आहे.