(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पुरस्कार कार्यक्रम IIFA (FFA Awards 2024) पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपट पुरस्काराची 24 वी आवृत्ती यावर्षी अबुधाबी येथे होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या पूर्व कार्यक्रमाच्या आधारे IIFA पुरस्कारांबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख खान, करण जोहर आणि साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती यांसारखे कलाकार सहभागी झाले होते. हा कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये या सोहळ्यातील एक खास क्षण दिसत असून, सध्या तो व्हिडीओ चर्चेत आहे. तो म्हणजे राणाने सगळ्यांच्या समोर शाहरुखच्या पायाला स्पर्श केला.
राणाने शाहरुख खानच्या पायाला केला स्पर्श
बाहुबली चित्रपटात भल्लाल देवाची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती हा साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार्सपैकी एक आहे. आयफा अवॉर्ड्सच्या अधिकृत घोषणेदरम्यान, त्याने शाहरुख खान आणि करण जोहरसोबत स्टेज शेअर केला. आणि या सोहळ्यादरम्यान त्याने बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या पायाला स्पर्श केला. यानंतर किंग खानने त्याला मिठी मारली. साऊथ सुपरस्टारचा शाहरुख खानबद्दलचा हा आदर पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. या प्रसंगाचा हा ताजा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेश शाह यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
चाहत्याने राणाचे केले कौतुक
एका युजरने कमेंट करून लिहिले, ‘साऊथ सिनेमाचा डाउन टू अर्थ सुपरस्टार’ असे लिहिले. तर, याशिवाय अनेक यूजर्स त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच, या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा- ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानचा ॲक्शन ड्रामा, सुपरस्टारमध्ये रंगणार जुगलबंदी; Devara Part -1 चा ट्रेलर रिलीज
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये शाहरुखचा मोठा कौल
दक्षिणेतील दिग्दर्शक ॲटलीचा जवान हा चित्रपट केल्यानंतर शाहरुख खानचा इंडस्ट्रीतील दर्जा चांगलाच वाढला आहे. राणा दग्गुबातीआधी विजय सेतुपती आणि प्रिया मणी यांसारख्या अभिनेत्यांनी शाहरुखचे खूप कौतुक केले आहे.