'देवरा' च्या यशाने ज्युनियर एनटीआर भारावला, पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टीमचे मानले आभार
ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘देवरा पार्ट १’चा अखेर ट्रेलर रिलीज झालेला आहे. दमदार ॲक्शन आणि ड्रामा चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणून धरली आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. पोस्टर, गाणी, टीझरने आणि आता ट्रेलरने प्रेक्षकांची चित्रपटाची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना ज्यु. एनटीआरची स्टाईल आणि शिवाय त्याचा अंदाज तर जान्हवी कपूरसोबतची केमिस्ट्री कमालीची लक्ष वेधून घेतेय.
हे देखील वाचा – यश अन् सनी देओल कधी सुरु करणारं ‘रामायण’ चं शूट? तारीख आली समोर
काही तासांपूर्वीच ‘देवरा पार्ट १’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या ट्रेलरची सुरूवातच रक्तपात दृश्यांनी आणि ॲक्शन सीन्सने होत आहे. २ मिनिट ४३ सेकंदाच्या दृश्यांच्या सीन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या कथानकात सैफ अली खानची आणि ज्यु. एनटीआरच्या ॲक्शन सीन्सची झलक पाहायला मिळते. मुख्य बाब सांगायचे तर, ज्यु. एनटीआरचे चित्रपटामध्ये डबल रोल दिसत आहेत. पहिल्या रोलमध्ये तो जनसामान्य आणि भित्रा माणूस दाखवला आहे. तर दुसऱ्या रोलमध्ये, वडिलांच्या भूमिकेत, दानशूर, कोणालाही न घाबरणारा दाखवला आहे.
त्यामुळे अभिनेत्याचे दोन विभिन्न रुप पाहून आपसुकच फॅन्स चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये देवराचं आणि भैराचं (ज्यु. एनटीआर आणि सैफ अली)चं रक्त पिण्यासाठी समुद्र आतुरलेला आहे. ह्या सीनवेळी अंगावर शहारे येतात. सैफने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. एकंदरीतच ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्याला चित्रपटाचं कथानक समुद्री डाकू संबंधित असल्याचं कळतं. नेमकं चित्रपटाचं कथानक काय आहे ? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथानकाचं लेखन कोरटाला शिवाने केलं असून चित्रपटाची निर्मिती युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर यांनी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट ३०० कोटी रुपये आहे.
हे देखील वाचा – घरात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा मिळणार, सूरज म्हणतोय बिग बॉस बोलणार तसं मी वागणार
ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान व्यतिरिक्त प्रकाश राज, मिका श्रीकांत, शाइन टॉम चाको, चैत्रा रॉय आणि श्रुती मराठे या कलाकारांनीसुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेची झलकसुद्धा ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली असून तिच्या भूमिकेबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.