शाहरुख खानने IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पहिल्यांदाच मुलगा आर्यनच्या अटकेबाबत केला खुलासा! (फोटो सौजन्य- Xअकाउंट)
आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. याबाबत बॉलीवूड स्टार शाहरुख खानने IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पहिल्यांदाच या गोष्टीचा मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने मुलगा आर्यन खानच्या या प्रकरणाच्या वेळी आपले धैर्य आणि शौर्य दाखवले. अनेकांनी असा दावा केला होता की या काळात शाहरुख खान मीडियावर खूप नाराज आहेत आणि आजपर्यंत त्याने त्यांना माफ केलेले नाही. मात्र आता, शाहरुख खानने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण टप्पा आणि संपूर्ण कुटुंब या प्रकरणाला कसे सामोरे गेले हे अभिनेत्याने सांगितले आहे.
आयफा अवॉर्ड्स 2024 मध्ये जवानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त करताना बॉलीवूड किंग भाषणात म्हणाला, “मला इतर सर्व नामांकित व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. “मला पुरस्कार आवडतात…मी मनापासून इथे परतलो आहे आणि वर्षाचा शेवट अशा सकारात्मकतेने करताना मला आनंद होत आहे. आपण सर्वजण व्यावसायिक आहोत आणि आपापले काम करत आहोत, पण मी जवान चित्रपटाच्या टीमचे देखील मनापासून आभार मानू इच्छितो, ज्यांनी हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी २-३ वर्षे मेहनत घेतली.’ असे शाहरुख म्हणाला.
And the best actor award male IIFA2024 goes to Mr Shahrukh Khan for the film Jawan
🔥🔥🔥#SRK #iifa#IIFA2024 #Jawan#IIFAawards2024 #KINGKHAN pic.twitter.com/OWRrlagZSK
— ReviewMania (@reviewmaniaa) September 28, 2024
तसेच पुढे अभिनेत्याने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने मुलगा आर्यन खानच्या अटकेचा संदर्भ देत त्याच्या आयुष्यातील खडतर आठवणीबद्दल सांगितले. “कोणीतरी मला आठवण करून दिली की चित्रपटात पैसे लावले पाहिजेत. म्हणून मला गौरीचे आभार मानायचे आहेत. ती गौरी एकमेव अशी पत्नी असेल जी तिच्या पतीपेक्षा जास्त पैसे खर्च करते. जवान बनवताना आम्ही कठीण काळातून जात होतो. तिचा संयम, सद्भावना आणि नम्रतेबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” असे अभिनेता म्हणाला.
हे देखील वाचा- रणवीर अलाहाबादियानंतर ‘या’ अभिनेत्याचे झाले फेसबुक अकॉउंट हॅक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!
आर्यनला ऑक्टोबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी मे महिन्यात सुपरस्टारच्या मुलाला ड्रग प्रकरणात सुटका मिळाली होती आणि दावा करण्यात आला होता की तो या प्रकरणात सामील नव्हता.