(फोटो सौजन्य-Social Media)
मनोरंजन जगतातील सेलिब्रिटींवर सायबर गुन्हांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहेत. प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादिया याचे युट्युब चॅनेल हॅक झाल्याची बातमी चर्चेत होती. आता याचदरम्यान आणखी एक बातमी समोर आली आहे. या हॅकिंग प्रकरणात आता भारतीय लोकप्रिय अभिनेता तुषार कपूर नवा बळी ठरला आहे. अभिनेत्याचे आज सकाळी ३० सप्टेंबर रोजी फेसबुक अकॉउंट हॅक झाले आहे. ही बातमी अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
तुषार कपूरने आज सकाळी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचे फेसबुक अकॉउंट हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचे दोन अकाउंट हॅक झाल्याचे त्याने सांगितले आहे. अभिनेत्याचे ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, “नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला कळवू इच्छितो की माझे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही फेसबुक अकाउंट हॅक झाले आहेत, त्यामुळे मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जास्त सक्रिय नव्हतो. माझी टीम आणि मी या घटनेवर लक्ष देऊन यशस्वी मार्ग काढू, आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. यावेळी मी तुमच्या सहनशीलतेची आणि समजूतदारपणाची प्रशंसा करतो. आणि लवकरच तुमच्या सर्वांशी पुन्हा कनेक्ट होण्यास मी देखील खूप उत्सुक आहे. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा- रणवीर अलाहाबादियानंतर ‘या’ अभिनेत्याचे झाले फेसबुक अकॉउंट हॅक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!
तुषार कपूरचे आगामी चित्रपट
अभिनेत्याने अनेक हिंदी चित्रपटामध्ये तसेच सिरीज मध्ये काम केले आहे. तसेच सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असून, हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेता ‘दस जून की रात’ हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे. जी जिओ सिनेमावर लवकरच प्रदर्शित होणार आहे.