(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
असाही एक बॉलिवूड स्टार आहे ज्याच्या वडिलांनी त्याला टेलर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, बॉलिवूड अभिनेता बनून या स्टारने वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. या अभिनेत्याचे नाव आहे शक्ती कपूर. हा अभिनेता एका सामान्य कुटुंबातून बॉलीवूड इंडस्ट्रीत आला. शक्ती कपूरचे वडील शिंपी होते. शक्ती कपूर यांनी आपले काम पुढे नोवे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, शक्ती कपूरच्या नशिबी काही वेगळेच होते. हा निरागस दिसणारा मुलगा बॉलिवूडचा क्राइम मास्टर गोगो बनला. आणि अभिनयाची भुरळ घालून चाहत्यांच्या मनात अनोखे स्थान निर्माण केले.
शक्ती कपूर यांचे नाव आधी सुंदरलाल कपूर होते. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यासाठी शक्ती कपूर यांनी त्यांचे नाव बदलले होते कारण त्यावेळी 2 सुंदरलाल आधीपासूनच बॉलिवूडमध्ये काम करत होते. शक्ती कपूर यांनी 1977 मध्ये ‘खेल खिलाडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर शक्ती कपूरने मागे वळून पाहिले नाही. नंतर अभिनेत्याने प्रत्येक चित्रपटामध्ये जोरदार काम केले आणि चाहत्यांची प्रशंसा मिळवली.
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
शक्ती कपूरच्या वडिलांना त्यांचे काम अजिबात आवडले नाही. अभिनेता झाल्यानंतरही शक्ती कपूरच्या वडिलांना त्याला टेलर पाहण्याची इच्छा होती. परंतु शक्ती कपूरने वडिलांचे कधीही ऐकले नाही. शक्ती कपूर यांनी सर्वप्रथम छोट्या भूमिका करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर शक्ती कपूरने खलनायक बनून बॉलिवूडवर वर्षानुवर्षे राज्य केले. शक्ती कपूरशिवाय चित्रपटाची कल्पना करणे लोकांना अवघड जायचे. अभिनेत्याच्या आईला शक्ती कपूरच्या खलनायकाच्या भूमिका कधीच आवडल्या नाहीत. अशा भूमिका केल्यामुळे आई अनेकदा शक्ती कपूरवर चिडायची. शक्ती कपूरला त्याच्या आईने अनेकदा फटकारले देखील आहे.
हे देखील वाचा- ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!
इन्सानियत का दुश्मन हा चित्रपट पाहण्यासाठी शक्ती कपूरची आई सिनेमागृहात गेली होती. चित्रपटात शक्ती कपूरला मारहाण झाल्याचे पाहून त्यांच्या आईला प्रचंड राग आला आणि त्या चित्रपट अर्धवट सोडून घरी परतल्या. वडिलांप्रमाणेच श्रद्धा कपूरनेही बॉलिवूडमध्ये आपले करिअर घडवले आहे. स्त्री 2 ची ही सुंदरी आज तिच्या वडिलांपेक्षा मोठी स्टार बनली आहे. चाहत्यांच्या मनात अभिनेत्रीने देखील वडिलांसारखे स्थान निर्माण केले आहे.