(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘अनुपमा’ या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची वेगळीच उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही वर्चस्व गाजवले आहे. ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसली. खेळवून ठेवणारे नाट्य आणि या मालिकेला मिळणारी नवी वळणे यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची कायम पसंती राहिली आहे.
या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागात, प्रेक्षकांना नवे काहीतरी रंजक आणि पाहायला मिळाले आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची मोठी प्रशंसा आणि प्रेम लाभले आहे. असे असताना, आता प्रेक्षकांकरता आणखी एक आश्चर्य या मालिकेत उलगडणार आहे, याचे कारण ‘अनुपमा’ ही मालिका चक्क एका पिढीची झेप घेत, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘अनुपमा’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून, आणखी दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आद्याचे पात्र अलिशा परवीन साकारणार असून, आद्याचा ज्याच्या प्रेमात पडली आहे, तो प्रेम ही व्यक्तिरेखा शिवम खजुरिया साकारणार आहे.
या मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच नव्या रूपातील मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात ‘अनुपमा’च्या नव्या प्रवासाची झलक मिळते. यात अनुपमा वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे आणि ‘अनु की रसोई’ हा तिचा स्वत:चा व्यवसाय यशस्वी करताना दिसणार आहे. ‘अनुपमा’ला तिच्या कुटुंबाची आठवण येत असते आणि आद्या या तिच्या लेकीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा असते.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात केला मोठा खुलासा! म्हणाले दाऊद इब्राहिम…
दुसरीकडे, आद्या आता एक टूर गाईड बनली आहे आणि एके दिवशी आद्या एका मंदिरात प्रेमला भेटते. आद्याला बघताच क्षणी प्रेमला देखील तिच्या प्रेमात पडतो. आद्या नात्यातील गुंतागुंतीचा विचार करते आणि तिच्या आईच्या जगापासून दूर आहे. एका नव्या, अनोळखी व्यक्तीच्या प्रयत्नाने आई आणि मुलीतील नाते सुधारेल का? मुलीला शोधून काढण्याचे आईचे प्रयत्न सफल होतील का? हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे. १४ ऑक्टोबर पासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘अनुपमा’ मालिकेचा हा नवा प्रवास सुरु होणार आहे.