खतरों के खिलाडी सिझन 14 च्या या सीझनमध्ये सुरुवात अनेक वाद पाहायला मिळाले. हे वाद फक्त स्पर्धकांमध्ये नाही तर होस्ट रोहित शेट्टी यांच्यापर्यत पोहोचले होते. पहिल्या तीन भागांमध्ये स्पर्धक, रोहित शेट्टी आणि आसीम रियाझ यांच्यामध्ये कडाक्याचे वाद दिसले. त्यानंतर शोचा होस्ट रोहित शेट्टीने स्पर्धकांसमोर अनेक नवनवीन आव्हान उभी केली होती. आता खतरों के खिलाडी 14 आता अंतिम टप्प्यात आहे. या शोचा महाअंतिम फेरी पुढील आठवड्यात होणार आहे. गेल्या आठवड्यात, तिकीट टू फिनाले टास्क झाला, ज्यामध्ये एक स्पर्धक जिंकला आणि शोचा पहिला फायनलिस्ट ठरला तो म्हणजेच करणवीर मेहरा.
करणवीर मेहराने अंतिम फेरीचे तिकीट जिंकले होते आणि रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित शोचा पहिला फायनलिस्ट बनून तो ट्रॉफीच्या जवळ आला होता. करणवीर मेहरा नंतर, आता खतरों के खिलाडी 14 ला त्याचा दुसरा फायनलिस्ट देखील सापडला आहे, जो ग्रँड फिनालेमध्ये करणवीर आणि आणखी एका स्पर्धकाशी सामना करेल. करणवीर मेहरा व्यतिरिक्त, खतरों के खिलाडी 14 मध्ये जर कोणता स्पर्धक सर्वात मजबूत मानला जात असेल तर तो गश्मीर महाजनी होता, ज्याने सुरुवातीपासून उपांत्य फेरीपर्यंत अनेक स्टंट जिंकले. तथापि, अंतिम फेरीच्या इतक्या जवळ आल्याने, तो चुकला आणि टॉप 2 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
टाईम्स नाऊ च्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, करणवीर नंतरचा दुसरा फायनलिस्ट दुसरा कोणी नसून शालिन भानोत आहे, ज्याने या सीझनमध्ये सर्वाधिक स्टंट्स रद्द केले आहेत. शोमधले स्पर्धकच नाही तर रोहित शेट्टीही त्याची खूप चेष्टा करतो. शालिन हा शोचा दुसरा फायनल असून, ‘सिंघम अगेन’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी आज त्याची घोषणा करणार आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये रोहित शेट्टीने शोमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला आणि स्पर्धकांना सांगितले की दोन टास्क खेळल्या जातील ज्यानंतर शोचा दुसरा फायनल कोण होणार हे ठरवले जाईल. पहिला टास्क गश्मीर महाजनी, सुमोना चक्रवर्ती आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्यात खेळला गेला. यामध्ये गश्मीरने पहिले टास्क जिंकला आहे.
दुसऱ्या टास्कमध्ये तो होता शालिन-नियती विरुद्ध अभिषेक-कृष्णा. शालिन आणि नियती यांनी हा वॉटर टास्क जिंकला आणि अंतिम फेरीच्या शर्यतीकडे वाटचाल केली. यानंतर, खतरों के खिलाडी 14 चा दुसरा फायनल होण्यासाठी खेळलेल्या टास्कमध्ये शालिन-गश्मीर आणि नियती समोरासमोर राहिले. या अंतिम टास्कमध्ये शालीन भानोटने गश्मीर आणि नियती या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना मागे टाकले आणि तो या मोसमाचा दुसरा फायनल ठरला. खतरों के खिलाडी सीझन 14 चा फिनाले येत्या रविवारी होणार आहे.