(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
समंथा रुथ प्रभूपासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यला दुसरे प्रेम मिळाल्याची चर्चा होती. बॉलीवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत त्यांचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात होते. डेटिंगच्या बातम्यांदरम्यान दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. आता त्यांच्या नात्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे. समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. 8 ऑगस्ट रोजी त्याने साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले. नागार्जुनने त्याचा मुलगा आणि भावी सुनेच्या एंगेजमेंटच्या फोटोंसह याची घोषणा केली होती. तसेच आता यादरम्यान, शोभिताने नागा चैतन्यसोबतच्या तिच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
शोभिता आणि नागा चैतन्यच्या एंगेजमेंटचे फोटो
डेटिंगच्या वेळी नागा चैतन्य किंवा शोभिता दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. एंगेजमेंटनंतर पहिल्यांदाच शोभिताने चैतन्यसोबतचे फोटो शेअर केला आहे. रोमँटिक फोटोंमध्ये हे कपल एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले दिसत आहे. एका फोटोमध्ये दोघेही झुल्यावर बसून एकमेकांच्या डोळ्यात मग्न झालेले दिसून येत आहेत.
शोभिता चैतन्यसोबत झाली रोमँटिक
तसेच, एका फोटोमध्ये शोभिताने नागा चैतन्यभोवती हात ठेवून कॅमेराकडे पाहत पोज दिली आहे. एक तर अभिनेत्री मनमोकळेपणाने हसत आहे आणि मागे बसलेल्या चैतन्यलाही आपले हसू आवरता येत नाही आहे. शेवटच्या फोटोमध्ये चैतन्यने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या कंबरेवर हात ठेवून पोज दिली आहे. अभिनेत्री शोभिताने केशरी रंगाची सिल्क साडी पारिधान केली असून, सोन्याच्या दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये चैतन्य कमी सुंदर दिसून येत आहे.
होणाऱ्या पतीसाठी अभिनेत्रीने अभिनेत्रीने लिहिली नोट
रोमँटिक एंगेजमेंटचे फोटो शेअर करताना, शोभिता धुलिपालाने कुरुन्थोगाईचे एक कोट शेअर केले आहे, ज्याचा अनुवाद ए के रामानुजन यांनी केला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “काय होईल माझी आई तुझी झाली तर? माझे वडील तुझे झाले तर? आणि तू आणि मी कसे भेटलो? पण प्रेमात, आमची हृदये लाल माती आणि पावसाच्या सरीसारखी आहेत.” अशी तिने या सुंदर पोस्टला कॅप्शन लिहिले आणि या फोटोला चाहत्यांसह अनेक कलाकारांचा प्रतिसाददेखील मिळाला.
हे देखील वाचा- मुलाच्या एंगेजमेंटबद्दल पहिल्यांदा बोलले नागार्जुन, म्हणाले – समंथाच्या घटस्फोटानंतर नैराश्यात होता चैतन्य!
मिर्झापूर स्टार दिव्येंदू, मलायका अरोरा, फातिमा ना शेख, दिव्या मिर्झा, मनीष मल्होत्रा यांसारख्या कलाकार आणि चाहत्यांनी शोभिता आणि नागा चैतन्य यांना त्यांच्या एंगेजमेंटबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.