(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी अचानक लग्न करत असल्याचा अनके चाहत्यांना आश्चर्याचा थक्क मिळाला आहे. मात्र, ही बातमी एंगेजमेंटच्या दिवशी लीक झाली आणि एंगेजमेंटनंतर नागार्जुनने स्वत: त्याच्या मुलाचे आणि भावी सुनेचे फोटो शेअर केले जे पाहून चाहत्यांना खात्री पटली. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते पण त्यांनी हे स्पष्ट केले नाही. आणि आता दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
चैतन्यला नैराश्यात होता
आता अलीकडेच नागार्जुनने एका मुलाखतीत चैतन्य आणि समंथा यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे. टाइम्स नावला दिलेल्या मुलाखतीत नागाने सांगितले की, “चैतन्याने सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर तो बरेच काळ डिप्रेशनमध्ये होता. मात्र, शोभितासोबतच्या लग्नानंतर तो आता खूप आनंदी आहे. अभिनेता म्हणाला, त्याला खूप आनंद झाला आहे. शोभितासोबत तो पुन्हा आनंद झाला आहे. मी पण खूप आनंदी आहे. त्याच्यासाठी किंवा कुटुंबासाठी ही सोपी वेळ नव्हती. सामंथापासून वेगळे झाल्यानंतर तो नैराश्यात होता. माझा मुलगा त्याच्या भावना कोणाला दाखवत नाही. पण तो नाखूष होता हे मला माहीत होतं. त्याला पुन्हा हसताना पाहून मलाही आनंद झाला आहे. शोभिता आणि चैतन्य हे एक उत्तम जोडपे आहेत. दोघे एकमेकांबरोबर खूप खुश देखील आहेत. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.” असं अभिनेता चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी सांगितले.
नागार्जुन शोभिताला आधीच ओळखत होते
लग्नाच्या तारखेबद्दल बोलताना नागार्जुन म्हणाला, “आम्ही घाईघाईने लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण तो शुभ दिवस होता. चैतन्य आणि शोभिताला लग्न करायचे होते. आम्ही म्हणालो, करूया.’नागार्जुन म्हणाले की, चैतन्य शोभिताला दोन वर्षांपासून ओळखत आहेत, पण मी तिला सहा वर्षांपासून ओळखतो. मी तिला आदिवी शेष यांच्या गुडचारी चित्रपटात पाहिले होते आणि तिचे काम मला खूप आवडले होते.” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा- Engaged! नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर, सोभिताचा सोबर आणि सुंदर लुक
शोभिता धुलिपालासोबत लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यचे पहिले लग्न समंथा रुथ प्रभूसोबत झाले होते. 2017 मध्ये लग्न करण्यापूर्वी त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. तथापि, या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आणि अभिनेता आता अभिनेत्री शोभिता धुलिपालसोबत दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे.