फोटो सौजन्य - Instagram
१३ वर्षांनंतर, ‘सन ऑफ सरदार’ दुसऱ्या भागासह परतला आहे. ‘सैयारा’ चित्रपटाच्या वादळापासून वाचवण्यासाठी हा चित्रपट एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला होता. तसेच, आपण असे ही म्हणू शकतो की ‘जस्सी’ ने प्रेक्षकांना मृणालच्या वाढदिवसाची भेट देण्यासाठी थोडा जास्त वेळ वाट पाहायला लावली आणि अभिनेत्रीच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित केला. पण तुम्ही काहीही म्हणा, यावेळी ‘सन ऑफ सरदार २’ ने आपला मुद्दा सिद्ध केला आहे आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे.
चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल लोकांची मते विभागली गेली आहेत. एका वापरकर्त्याने त्याला ४ स्टार दिले आहेत आणि त्याने या चित्रपटाला देसी कॉमेडी धमाका असल्याचे म्हटले आहे. वापरकर्त्याने लिहिले आहे, ‘हा संपूर्ण अजय देवगणचा शो आहे, जो देसी कॉमेडी आणि कौटुंबिक नाटकांनी भरलेला आहे. मृणाल ठाकूरने संपूर्ण चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. काही दृश्ये थोडी ताणलेली वाटत आहेत, परंतु एकूणच हा एक मजेदार प्रवास आहे जो पहिल्या भागाइतकाच मनोरंजन करतो.’ असे म्हणून चाहत्याने या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले ‘बरेच दृश्ये ताणलेली वाटत होती, पण एकूणच चित्रपटाने आम्हाला हसवले.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले ‘कथेत कोणताही मोठा ट्विस्ट नाही, परंतु चित्रपट मनोरंजन, विनोद आणि मसाला यांचे संपूर्ण पॅकेज देतो अगदी पहिल्या भागाप्रमाणेच.’ असे लिहून नेटकऱ्यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.
⭐️⭐️ ⭐️⭐️ #SonOfSardaar2 Review:#AjayDevgn is back with his desi swag, comedy timing, and powerful screen presence. The film blends family drama, action, and emotional moments while keeping the light-hearted Punjabi flavor alive.
🔥 #MrunalThakur adds charm and delivers a… pic.twitter.com/TlBRepYbh7
— Ravi Chaudhary (@BURN4DESIRE1) July 31, 2025
‘सन ऑफ सरदार २’ ची कथा
या चित्रपटाची कथा मागील चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होते, जस्सी आता त्याचे अपूर्ण प्रेम शोधण्यासाठी आणि कौटुंबिक वाद सोडवण्याच्या मोहिमेवर आहे. दिग्दर्शक विजय कुमार अरोरा यांनी यावेळी विनोद, भावना आणि पंजाबी शैलीचे मिश्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक त्याच्या प्रयत्नांना संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. तसेच प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट खूप आवडली आहे.
Bigg Boss 19 : नव्या सिझनसाठी प्रेक्षक तयार, वाचा केव्हा आणि कोणत्या वेळेला सुरु होणार सलमानचा शो?
‘सन ऑफ सरदार २’ ची स्टारकास्ट
‘सन ऑफ सरदार २’ मध्ये, अजय देवगण पुन्हा एकदा जस्सी रंधावाच्या भूमिकेत त्याच्या देसी शैली आणि मजबूत पडद्यावर उपस्थितीसह परतला आहे. अभिनेत्यासोबत राबियाच्या भूमिकेत मृणाल ठाकूर दिसली आहे. डिंपलच्या भूमिकेत नीरू बाजवा आणि राजाच्या भूमिकेत रवी किशन दमदार भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या सहाय्यक कलाकारांमध्ये दीपक डोबरियाल (गुल), चंकी पांडे (दानिश), कुब्बरा सैत (महविश), संजय मिश्रा (बंटू पांडे), अश्विनी काळसेकर (प्रेमलता), डॉली अहलुवालिया (बेबे), मुकुल देव (टोनी), विंदू दारा सिंग (सहोग्गी), मेहताब (तीवजी) आणि सहकलाकार यांचा समावेश आहे. या मोठ्या स्टारकास्टसोबत हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.