(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी ‘तू धडकन मैं दिल’ ही एक नवीन भावनिक कथा घेऊन येत आहे. ही मालिका एका लहान मुलीच्या जीवनावर आधारित आहे जिचे नाव दिल असते. जी लहान वयातच धैर्य आणि निरागसतेचे उदाहरण बनते. ही भूमिका बाल अभिनेत्री आराध्या पटेल साकारत आहे, जी तिच्या गोंडस अभिनयाने आणि भावनेने मन जिंकत आहे. या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे त्यामधील तिचा अभिनय प्रेक्षकांना जास्त भावला आहे. ही मालिका लवकरच स्टार प्लस वाहिनीवर सुरु होणार आहे.
‘Meesho ची दीपिका…’, अनन्याचा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांचा संताप; कार्तिक आर्यनलाही केले ट्रोल
अलीकडे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, दिल एका खूप गर्दी असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी पिशवी घेऊन एका मांजरीचा पाठलाग करते आहे. ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस पडत असताना, दिल तिच्या हरवलेल्या आईबद्दल बोलते, ती तिच्या आईचा फोटो हृदयाशी घट्ट धरून बसली आहे. तिला आशा आहे की, एकदा पाऊस थांबला की तिला तिचे आई आणि बाबा सापडतील. आणखी एका भावव्याकुळ क्षणी, दिल एका कुटुंबाला एकत्र खाताना बघते. ते बघताना तिच्या डोळ्यांतून एकाकीपण प्रतिबिंबित होताना दिसते, तरीही मागे हटण्याऐवजी, ती तिच्या पिशवीतून खाणे बाहेर काढते आणि तिच्या शेजारी बसलेल्या मांजरीसोबत तो खाऊ प्रेमाने शेअर करते. या साध्या कृतीतून तिचा काळजी घेणारा स्वभाव दिसून येतो. दिल एक आशादायी मुलगी आहे. ठाम आणि धाडसी आहे आणि सोबतच प्रचंड आशावादी आहे. प्रोमोमधली प्रत्येक, फ्रेम आपल्या उपस्थितीने तिने जिवंत केली आहे.
संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
दिलचा प्रवास तिच्या पालकांच्या शोधातून सुरू होतो. ती एकटी का आहे आणि तिच्या कुटुंबाचे काय झाले? तिचे धाडस आणि तिचा दयाळूपणा तिला तिच्या पालकांना भेटण्यास मदत करेल का? ‘तू धडकन मैं दिल’ ही मालिका जणू प्रत्येक कुटुंबाकरता एक हृदयस्पर्शी आणि आनंदी नात्याचा प्रवास कसा होतो, यांचा प्रत्यय देते. भावना, प्रेम आणि आशा यांनी ओतप्रोत भरलेली ही कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २३ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लस वाहिनीवर ‘तू धडकन मैं दिल’ ही मालिका पाहायला मिळणार आहे.