(फोटो सौजन्य - x अकाउंट)
करिश्मा कपूर यांचे एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार आज दिल्लीत होणार आहेत. याशिवाय २२ जून रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रार्थना सभा आयोजित केली जाणार आहे. लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने संजय यांचे निधन झाले. संजय यांच्या कुटुंबाने एक प्रेस नोट जारी केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार विधी पार पडतील असे सांगण्यात येत आहे.
पापाराझी विरल भयानी यांनी संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कार आणि प्रार्थना सभेची माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, २२ जून रोजी दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रार्थना सभा आयोजित केली जाणार आहे. या नोटवर त्यांची आई राणी सुरिंदर कपूर, त्यांची पत्नी प्रिया, सफिरा, अझारियस यांची नावे लिहिली आहेत. तसेच यामध्ये त्यांची एक्स पत्नी करिश्माची मुले समायरा आणि कियान यांची नावे देखील समाविष्ट आहेत.
Karan Veer Mehra पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज; आगामी चित्रपटासाठी अभिनेत्याचे खतरनाक कमबॅक
कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की संजयच्या अमेरिकन नागरिकत्वाशी संबंधित कायदेशीर औपचारिकतेमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला उशीर होत आहे. संजयचे सासरे आणि त्याची पत्नी प्रिया सचदेव यांचे वडील अशोक सचदेव यांनी एनडीटीव्हीला सांगितले होते की अंत्यसंस्कार दिल्लीत होतील. त्यांनी सांगितले होते की, “सध्या पोस्टमॉर्टेम सुरू आहे. कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर, मृतदेह अंतिम संस्कारांसाठी भारतात आणला जाईल.”
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
करिश्मा कपूरचे एक्स पती आणि प्रिन्स विल्यमचे जवळचे मित्र संजय कपूर यांचे १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान निधन झाले. अनेक वृत्तांतांमध्ये असे म्हटले होते की संजयला पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आला. नंतर काही वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला होता की हा हृदयविकाराचा झटका मधमाशीच्या चाव्यामुळे झाला. तथापि, संजयच्या मृत्यूबाबत अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही.
‘Sitaare Zameen Par’ चित्रपटाच्या रिलीजआधीच निर्माते मालामाल, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बंपर कमाई!
संजय कपूरचे तीन लग्न झाले होते
संजयचे तीन वेळा लग्न झाले होते आणि त्यांना ३ मुले होती. त्यांचे पहिले लग्न १९९६ मध्ये फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत झाले होते आणि ते चार वर्षे टिकले. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडप्याला समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत. यानंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर संजयने २०१७ मध्ये प्रिया सचदेवशी लग्न केले आणि तिच्यासोबत राहत होते.