सोनी राजदानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बेबी शॉवर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने मसाबासाठी एक सुंदर नोटदेखील लिहिली आहे. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
मसाबा ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुंदर फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. मसाबा आणि सत्यदीप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले. आणि आता हे जोडपे त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे.
मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. तसेच ही अभिनेत्री आता लवकरच आई होणार असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासोबतच त्यांनी मसाबासाठी एक सुंदर नोटही लिहिली आहे. लिहिले आहे की, 'मसाबा आणि सत्यदीप आई-वडील होणार आहेत, त्यांना या सुंदर प्रवासासाठी शुभेच्छा.' असे लिहून त्यांनी या दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये मसाबा खूपच सुंदर दिसत होती. त्याच वेळी, भावी आजी आणि मसाबाची आई अभिनेत्री नीना गुप्ता देखील तिच्या सुंदर शैलीने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.
याशिवाय सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बेबी शॉवर पार्टीचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये सोनम आणि रिया मसाबासोबत खूप सुंदर दिसणार आहेत. कपूर बहिणी मसाबावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
हे बेबी शॉवरचे शेअर केलेले फोटो समोर येताच, हे दोघेही त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत. त्याचबरोबर पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सचेही कौतुक करत आहेत.